रशियाने युद्ध जिंकण्यासाठी कमांडर बदलला…

रशियाने युद्ध जिंकण्यासाठी कमांडर बदलला…

मॉस्को : गेल्या काही महिन्यांपासून रशिया-युक्रेनचे युध्द सुरु आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये शिरकाव करुन युक्रेनचा काही भाग युक्रेनने ताब्यात घेतला आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनने आजूबाजूच्या राष्ट्रांची मदत घेऊ नये असं आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी आपण चर्चेसाठी तयार असून चर्चा करुन आपण यातून मार्ग काढू असंही म्हंटलं होतं.

अशातच दोन्ही देशांमध्ये युध्दाची रणधुमाळी सुरु असतानाच रशियाचे मोठे नुकसान होत असल्याने रशियाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी लष्कराचा व सैन्याचा कमांडरच बदलला आहे.

यापुढे आता रशियाकडून या युध्दात नवीन कमांडर जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह असणार आहेत. त्यांच्याच नेतृत्वात हे युध्द लढलं जाणार असून ते सैन्यातील सर्वात वरिष्ठ अधिकारी असणा आहेत. ते रशियाचे चीफ ऑफ जनरल स्टाफ देखील आहेत. व्हॅलेरी गेरासिमोव्ह 2012 पासून या पदावर असून सेर्गेई सुरोविकिन यांच्या जागी ते आता युक्रेन युद्धाची संपूर्ण जबाबदारी घेणार आहेत.

याआधीचे कमांडर अधिकारी सुरोविकिन मागील तीन महिन्यांपासून नेतृत्व करीत होते. एकीकडे चर्चेसाठी तयार असलेल्या पुतीन यांनी आता लष्कराच्या विविध भागांमध्ये उत्तम संवाद साधण्यासाठी काही बदल करीत आहेत. पुतीन यांच्या या रणनीतीमागे राजकीय समीकरणं असल्याचं म्हंटलं जातंय. संरक्षण मंत्री सेर्गेई शोइगु यांच्यासह चीफ ऑफ जनरल स्टाफ यांच्या माध्यमातून पुतीन यांच्यापर्यंत पोहचून युध्द कमांडर झाल्यापासून सुरोविकिन शक्तिशाली झाल्याची चर्चा रंगली होती.

चीफ ऑफ स्टाफने स्वतः युक्रेन युद्धाचे नेतृत्व करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आता युद्ध मोठे आणि धोकादायक होणार आहे. त्याचवेळी, अनेक रशियन लष्करी ब्लॉगर्सचा असा विश्वास आहे की, युद्धातील अलीकडील पराभव आणि माकीव्हका येथे मारले गेलेल्या सैनिकांची सर्व जबाबदारी सुरोविकिन यांच्यावर टाकली जात असून त्यांना केवळ दोष दाखविण्यासाठी मोहरा बनविण्यात आला असल्याचं मॉस्कोमधील एका तज्ज्ञाकडून सांगण्यात येतंय.

दरम्यान, सर्गेई यांच्या नेतृत्वाखाली रशियाने युक्रेन युध्दासाठी मोठी राजकीय रणनीती आखली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली रशियाने युक्रेनच्या ऊर्जा केंद्रावर वारंवार हल्ले केलेले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube