MI-8T helicopter : रशियन MI-8T हेलिकॉप्टर बेपत्ता, क्रु मेंबरसह 22 जण करत होते प्रवास

MI-8T helicopter : रशियन MI-8T हेलिकॉप्टर बेपत्ता, क्रु मेंबरसह 22 जण करत होते प्रवास

MI-8T helicopter : रशिया (Russia) एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. रशियाचे MI-8T हेलिकॉप्टर (MI-8T helicopter) आज उड्डाणाच्या दरम्यान बेपत्ता झाले आहे. त्याचा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान, हेलिकॉप्टर बेपत्ता झाले तेव्हा तीन क्रू मेंबर्ससह एकूण 22 लोक हेलिकॉप्टर मध्ये होते.

MI-8T helicopter : रशियन MI-8T हेलिकॉप्टर बेपत्ता, क्रु मेंबरसह 22 जण करत होते प्रवास 

 

एमआय-8 हेलिकॉप्टरने कामचटका प्रदेशातील वचकाझेट्स ज्वालामुखीजवळून उड्डाण केले, परंतु नियोजित वेळेनुसार ते त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचले नाही, असे रशियाच्या फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे. सध्या या बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध घेण्यात येत असल्याचं माहिती एजन्सीनी दिली आहे.

माझा राजीनामा मागितला नाहीतर काहींना अपचन होतं…; फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला 

आयआरएने सूत्रांचा हवाला देत हेलिकॉप्टर तलावात कोसळल्याचे सांगितले. ते मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथून पर्यटकांना घेऊन जात होते.

सविस्तर वृत्त असे की, भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता हेलिकॉप्टर गंतव्य स्थळी परतणार होते मात्र ते परतले नाही. त्यामुळं हेलिकॉप्टरच्या क्रु मेंबरशी संपर्क करण्याचा  प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, बचाव कर्मचाऱ्यांनी बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध सुरू केला आहे. त्याच्या शोधासाठी अन्य विमान पाठवण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर बेपत्ता झालेल्या भागात रिमझिम पाऊस आणि धुके दिसत होते.

MI-8T ही Mil mi-8 हेलिकॉप्टरची सर्वाधिक वापरली हेलिकॉप्टर आहे. हे प्रथम 60 च्या दशकात डिझाइन केले गेले होते. 1967 मध्ये रशियन सैन्यासाठी ते पहिल्यांदा वापरले गेले. MI-8T हे जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरपैकी एक आहे. 50 पेक्षा जास्त देश त्याचा वापर करतात.

MI-8T ला यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला 16 जणांना घेऊन जाणारे MI-8T हेलिकॉप्टर पूर्व रशियात क्रॅश झाले होते.

कामचटका द्वीपकल्प त्याच्या निसर्गासाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. हे मॉस्कोच्या पूर्वेस 6000 किमी (3728मैल) आणि अलास्काच्या पश्चिमेस 2,000 किमी अंतरावर आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube