अल्टमन पहिलेच नाहीत! स्टीव्ह जॉब्स ते अश्नीर ग्रोवर; ‘या’ सीईओंना कंपन्यांनी दाखविला होता बाहेरचा रस्ता

अल्टमन पहिलेच नाहीत! स्टीव्ह जॉब्स ते अश्नीर ग्रोवर; ‘या’ सीईओंना कंपन्यांनी दाखविला होता बाहेरचा रस्ता

Sam Altman : ChatGPT चे निर्माते OpenAI कडून कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले होते. पण, कंपनीने जसा हा निर्णय घेतला कदाचित पुढे काय होईल याचा त्यांना अंदाज नसावा. कर्मचाऱ्यांनी धडाधड राजीनामे देण्यास सुरुवात केली. कंपनीवर दबाव वाढत चालला. अखेर कंपनीने माघार घेत सॅम ऑल्टमन यांना पुन्हा रुजू करून घेतले. तर अशी आहे थोडक्यात गोष्ट. पण, तुम्हाला माहिती आहे का की सॅम अल्टमनप्रमाणेच जगातील सहा मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या सहसंस्थापकांना अशाच पद्धतीने नारळ दिला होता. कालांतराने यातील काही जण परत आले आणि त्यांनी कंपनीला आणखी पुढे नेले.

सॅम अल्टमन यांना 17 नोव्हेंबर रोजी काढून टाकण्यात आले होते. या प्रकाराची चांगलीच चर्चा झाली होती. पण, थोड्याच दिवसांनंतर बातमी आली की अल्टमन पु्न्हा वापसी करणार आहेत. सॅमचे सहकारी, कर्मचारी आणि कंपनीच्या गुंतवणूकदारांनी दबाव निर्माण केला होता. या दबावापुढे कंपनी झुकली आणि त्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला गेला. सॅम अल्टमन यांच्याप्रमाणेच असे काही आणखी लोक आहेत ज्यांना कधीकाळी ते ज्या कंपनीत काम करत होते तिथून काढून टाकण्यात आले होते. यातील काही जण परत आलेही होते.

OpenAI मध्ये मोठी उलथापालथ; एका रात्रीत दोन संस्थापक कंपनीतून बाहेर : मिरा मुरातींच्या खांद्यावर धुरा

स्टीव्ह जॉब्स, अॅपल

सन 1985 मध्ये अॅपल कंपनीचे सीईओ जॉन स्कली आणि कंपनीच्या बोर्डाबरोबर मोठे वाद झाल्यानंतर बोर्डाने स्टीव्ह जॉब्स यांना तडकाफडकी काढून टाकले होते. पण तब्बल अकरा वर्षांनंतर स्टीव्ह पुन्हा कंपनीत रुजू झाले. नंतर त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर अॅपल कंपनीला जगात सर्वात यशस्वी बनवले. आज अॅपल ब्रँड जगभरात लोकप्रिय झाला आहे.

ट्रॅव्हिस क्लानिक, उबर

जून 2017 मध्ये क्लानिक सीईओ असताना त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. या कंपनीची स्थापना करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. एका शेअरधारकाच्या विद्रोहानंतर राजीनामा दिल्याने कंपनीत राहणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. कंपनीत घोटाळे आणि भेदभावाच्या तक्रारींनंतर गुंतवणूकदारांनी क्लानिक यांना राजीनामा देण्यास भाग पाडले.

अँड्र्यू मेसन, ग्रुपन

ग्रुपन इंक कंपनीने अँड्र्यू मेसन सीईओपदाचा कार्यभार सांभाळत असताना त्यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर त्यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझा साडेचार वर्षांचा कार्यकाळ अद्भूत होता. आता मी निर्णय घेतला आहे की येथून पुढे कुटुंबाला वेळ द्यायचा. मी गंमत करत आहे माझा आज राजीनामा घेण्यात आला.

ChatGPT vs Bard : AI स्पर्धेत गुगल मायक्रोसॉफ्टची शर्यत, एआय सर्च इंजिनला मारेल का?

अश्नीर ग्रोवर, भारतपे

भारते पे कंपनीचे संस्थापक अश्नीर ग्रोवर यांनी कंपनीत मोठ्या उलथापालथीनंतर राजीनामा दिला होता आणि भारतीय फिनटेक स्टार्टअपमध्ये प्रबंध निदेशक पदाची जबाबदारी सोडून दिली. बोर्डाला पाठवलेल्या ईमेलमध्ये त्यांनी म्हटले की माझ्या कुटुंबावर निराधार आणि ठरवून केलेले हल्ले आणि कंपनीच्या अन्य सहसंस्थापक, गुंतवणूकदारांमध्ये अहंकाराच्या लढाईनंतर कंपनीमधून तत्काळ बाहेर पडत आहे.

माइक लाजारिडिस आणि जिम बाल्सिली, ब्लॅकबेरी

ब्लॅकबेरी निर्माता रिसर्च इन मोशन ज्याची स्थापना त्यांनी केली होती. या कंपनीतही मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर जिम बाल्सिली आणि माइक लाजारिडिस यांनी सहसीईओ पदाचा राजीनामा दिला होता.

मार्क पिंकस, जिंगा

जून 2014 मध्ये जिंगा कंपनीने घोषणा केली होती की संस्थापक मार्क पिंकस त्यांच्या कर्तव्यांतून मुक्त होतील. 2007 मध्ये सोशल गेमिंग सुरू करणारे पिंकस बोर्डाचे अध्यक्ष म्हणून राहतील. पिंकस यांनी फार्मविले, वर्ड्स विद फ्रेंड्स, सिटीविले यांसह अन्य सामाजिक गेम जारी करत कंपनीला प्रसिद्धी आणि फेसबुकवर यश मिळवून देण्यात योगदान दिले होते.

शॉन रेड, टिंडर

शॉन रेड यांना 2015 मध्ये कंपनीच्या सीईओ पदावरून हटविण्यात आले होते. पण सहा महिन्यांनंतर ते पुन्हा कंपनीत रुजू झाले होते. त्यानंतर काही काळानंतर त्यांनी राजीनामा दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube