युद्धात सुदान उद्ध्वस्त, 400 जणांचा मृत्यू; अद्यापही संघर्ष कायम

युद्धात सुदान उद्ध्वस्त, 400 जणांचा मृत्यू; अद्यापही संघर्ष कायम

Sudan crisis : उत्तर आफ्रिकेतील (North Africa) देश सुदान (Sudan) प्रदेश गेल्या आठवडाभरापासून जळत आहे. सुदानमध्ये 15 एप्रिलपासून लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये (Army and Paramilitary) सुरू असलेल्या संघर्षात आत्तापर्यंत 400 लोकांचा मृत्यू (400 people died)झाला आहे. राजधानी खार्तूमसह (Khartoum)सुदानची अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. सुदानमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हाणी झाली असली तरी अद्यापही युद्ध सुरूच आहे.

खासदार संजय सिंह यांची ईडीलाच मानहानीची नोटीस, ’48 तासांत माफी मागा, अन्यथा….’

सुदानमध्ये लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह अल बुरहान आणि आरएसएफ प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डगालो यांच्यात वर्चस्वाचे युद्ध सुरू आहे. सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यातील युद्धात कोण बाजी मारणार? याचीही चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, अल-बुरहानचे सैन्य आरएसएफपेक्षा अधिक मजबूत आहे. अशा स्थितीत निमलष्करी दलाच्या विजयाची शक्यता कमी दिसते. मात्र, शहरी भागात निमलष्करी दलाचे जवान लष्करावर वर्चस्व गाजवतील.

अलजजीराच्या वृत्तानुसार, आणखी अनेक शहरं लवकरच सुरु असलेल्या हिंसाचाराच्या कचाट्यात येऊ शकतात. सुदानची राजधानी खार्तूम येथून ही हिंसक चकमक सुरू झाल्याची माहिती आहे, परंतु आता या युद्धाने ओमदुरमन आणि दारफुरसह अनेक शहरे आपल्या ताब्यात घेतली आहेत. इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने म्हटले आहे की, लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या या हिंसाचाराने युद्धाचे स्वरूप घेतले आहे. भविष्यात या युद्धाचा परिणाम शेजारील देशांवरही होऊ शकतो, अशावेळी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे कॅमेरॉन हडसन म्हणतात की, हिंसाचार सुदानच्या सीमेपलीकडे वाढू शकतो. हा संघर्ष देशभर पसरलेला आहे. अशा स्थितीत ही लढाई सुदानच्या बाहेर पडल्यास आश्चर्य वाटायला नको.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube