इस्त्रायल- हमासच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील किम डोकरकर भारतीय महिलेसोबत आणखी 2 महिलेचा मृत्यू
Israel Attack on Hamas : इस्रायल (Israel) आणि हमासमध्ये (Hamas) सुरू असलेलं युद्ध (War) अजून देखील सुरूच आहे. या युद्धामध्ये हमासला धडा शिकवण्यासाठी इस्रायलचे हजारो लोक रस्त्यावर उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. (Israel Hamas War) दरम्यान या युद्धामध्ये भारतीय वंशाच्या तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामधील एक महिला ही मूळ महाराष्ट्राची असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्राच्या किम डोकरकर या महिलेचा या युद्धाच्या दरम्यान मृत्यू झाला.
किम डोकरकर या इस्रायली सैन्यामध्ये ते कर्तव्य बजावत होते. त्या दरम्यान त्यांना वीरमरण आलं आहे, तर दुसरी महिला ही इस्रायलच्या पोलीस दलात कार्यरत होती. यामधील एका महिलेची अद्याप ओळख पटली नाही. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलमध्ये 18 हजार भारतीय वंशाचे यहूदी लोक राहत आहेत. या भारतीय वंशाच्या नागरिकांना बेने यहुदी असे संबोधले जातात. बेने यहूदी याचा अर्थ मूळ धर्म दुसरा असलेले लोक. जे लोक वेगळ्या धर्माचे होते.
#WATCH उत्तरी इज़राइल | एक भारतीय व्यक्ति ने कहा, “मुझे यहां रहते हुए 10 साल हो गए हैं। मेरा परिवार, व्यापार यहीं है। यहां थोड़ा डर का माहौल है लेकिन अन्य परिवार भी यहां रहते हैं। हम इजरायली फौज के लिए भारतीय शाकाहारी खाना बनाकर देते हैं… हमने अपना कुछ नाम कमाया है और इजरायल की… pic.twitter.com/KGREI9z2cj
— ANI_HindiNews (@AHindinews) October 15, 2023
परंतु त्यांनी आता यहूदी धर्म स्वीकारला असल्याचे समोर आले आहे. म्हणजे त्यांनी धर्मांतरी लोक. केरळ, मणिपूर आणि मिझोराममधील अनेक लोकांनी इस्रायलमध्ये यहूदी धर्म स्वीकारला असल्याचे समोर आले आहे. 7 ऑक्टोबर दिवशी हमासने दक्षिण परिसरात हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यात या ३ महिलाचा मृत्यू झाला आहे. अशदोदच्या होम फ्रंट कमांडर लेफ्टिनंटचा देखील मृत्यू झाला आहे. २२ व्या वर्षी युद्धामध्ये त्यांना वीर मरण आल्याची माहिती समोर आली आहे. मोसेस तसेच पोलीस सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या सीमा पोलीस अधिकारी किम डोकरकर यांचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी एका भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. परंतु अद्याप तिची ओळख पटली नाही.
इस्रायलमध्ये एक नियम आहे. प्रत्येक नागरिकाने कमीत कमी ३ वर्षापर्यंत लष्करात सेवा केली पाहिजे. जे लोक लष्करात सेवा करणार नाहीत, त्यांना देशातील मिळणाऱ्या सुविधांपासून बाजूला ठेवले जातं. या निमित्ताने इस्रायली नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी तयार केली जातं असते. इस्रायलच्या चोहोबाजूंनी मुस्लिम राष्ट्र आहेत. इस्रायलची सागरी परिस्थिती देखील संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. यामुळे इस्रायलने लष्करामध्ये सेवा देण्याचा नियम घालून दिला आहे. तसेच इस्रायलला उत्तर गाजावर देखील ताबा मिळवायचा आहे. कारण उत्तर गाजा हे हमासचं मुख्य केंद्र असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हे केंद्रच इस्रायलला उद्ध्वस्त करायचं आहे.
Israel Palestine War : गाझातील नागरिकांना 3 तासांची डेडलाईन; इस्त्रायलने नेमकं काय केलं ?
सध्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आतापर्यंत २२१५ पॅलेस्टिनींना आपला जीव गमावला आहे, तर जखमींची संख्या ८७१४ इतकी आहे. मृतांमध्ये ७०० मुलांचाही समावेश आहे. वेस्ट बँकमध्ये आतापर्यंत ५० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.