जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चकमक, चेकपोस्टवर आलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चकमक, चेकपोस्टवर आलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घडना जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये घडलीय. बडगाममध्ये दोन दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्करी जवान आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन्ही दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. ही चकमक एसएसपी कार्यालयाजवळ झालीय. अरबाज मीर आणि पुलवामाचा शाहिद शेख अशी त्यांची नावे आहेत. ते लष्कर या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता.

आज 17 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एसएसपी कार्यालायजवळील चेकपोस्टवर दोन संशयित तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर या दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरु केला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांकडूनही प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला आहे. सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक दहशतवाद्याचा खात्मा झाला तर दुसऱ्या दहशतवाद्याला गोळी लागल्याने तो लपून बसला.

गोळीबार सुरु असतानाचा एका दहशतवाद्याला गोळी लागल्याने तो जवळच एका घरात जाऊन लपल्याचं जवानांच्या लक्षात आलं. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांकडून शोधमोहिम राबवत लपून बसलेल्या दहशतवाद्याचा खात्मा केलाय. मिळालेल्या माहितीनूसार या चकमकीत दोन स्थानिक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, कोणीही जखमी न झाल्याचं सुरक्षा दलाकडून सांगण्यात येतंय. याआधी 27 डिसेंबरला जम्मू-काश्मीरमधील सिध्रा परिसरात चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

दरम्यान, 2022 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दहशतवाद्यांच्या भरतीमध्ये 37% घट झाली असून जी आजपर्यंतची सर्वाधिक आहे. सर्वाधिक 74 दहशतवादी लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाले. त्यापैकी 65 दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आल्याची माहिती विजय कुमार यांनी दिलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube