डोनाल्ड ट्रम्प अन् पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरण नेमकं आहे तरी काय?
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आरोपांपासून वाचण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्यावर पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला (Stormy Daniels)गुप्तपणे पैसे दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने (Manhattan Grand Jury)डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला चालवण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. आता अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षाला गुन्हेगारी खटल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असणार आहेत की, त्यांना महाभियोगाला (Impeachment)सामोरं जावं लागणार आहे.
Uorfi Javed : माफी मागत, उर्फी म्हणाली कपड्यांची स्टाईल बदलणार, नेटकरी झाले चकित
न्युयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेतील ग्रॅंड ज्युरिने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले. त्यानंतर पॉर्नस्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर खटला चालवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलसोबत संबंध असल्याचा आरोप आहे. स्टॉर्मीने स्वतः डोनाल्ड ट्रम्प आणि आपल्यात बराच काळ संबंध असल्याचं सांगितलं होतं. ट्रम्प यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले होते. मात्र त्यानंतर माध्यमांच्या रिपोर्टमधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. त्यामध्ये स्टॉर्मीला आपलं तोंड बंद ठेवण्यासाठी एक लाख तीन हजार डॉलर अर्थात जवळजवळ 80 लाख रुपये दिले होते.
स्टॉर्मीचं डॅनियलयचं खरं नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे. तीचा जन्म 17 मार्च 1979 रोजी अमेरिकेत झाला आहे. तीला पुढे स्टॉर्मी वॉटर्स या नावावेही ओळखलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेमधील पॉर्न इंडस्ट्रीमधील पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल आणि डोनाल्ड ट्रम्प यांची 2006 मध्ये एका गोल्फ टूर्नामेंटच्यावेळी भेट झाली होती. त्यानंतर त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प स्टॉर्मीच्या पाठिमागे लागल्याची माहिती आहे.
त्यावेळी डॅनियल्स 27 वर्षांची होते आणि ट्रम्प 60 वर्षांचे होते, या भेटीच्या दोन महिने आधी ट्रम्प यांची तिसरी पत्नी मेलानिया यांनी मुलगा बॅरॉनला जन्म दिला होता. काही काळानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि स्टॉर्मी आपापल्या कामात व्यस्त झाले. त्यानंतर 2016 च्या निवडणुकीवेळी हा विषय पुन्हा चर्चेत आला.