‘सरकार उत्तर का देत नाही ?’ तवांगमधील घुसखोरीवर सोनिया गांधी आक्रमक
नवी दिल्ली : चीन एलएसीवर सतत घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. नुकतचं तवांगमध्ये झालेल्या घुसखोरी याचं एक मोठा पुरावा आहे. इथं शेकडो चीनी सैनिक भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करत होते. ज्यांना भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिलं. या घटनेनंतर केंद्र सरकारवर विरोधी पक्षाच्या निशाण्यावर, कॉंग्रेस पंतप्रधान मोदी आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.
राहुल गांधींनंतर आता कॉंग्रेसच्याा माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही या मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधला. कॉंग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधींनी चीनी अतिक्रमणावर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘सरकार यावर चर्चा करत नाहिये. जनता आणि सभागृहाला सीमेवरील परिस्थिती काळाली पाहिजे. सरकार चीनी अतिक्रमणाचं सडेतोड उत्तर का देत नाही?’ हे प्रश्न उपस्थित करत तवांगमधील घुसखोरीवर सोनिया गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान कॉंग्रेस आणि पुर्ण विराधीपक्ष चीनच्या मुद्द्यावर संसदेत विस्तृत चर्चेची मागणी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारवर तवांगमधील भारत-चीन संघर्षावर चर्चेची मागणी करत काँग्रेस खासदार सोनिया गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनी संसदेच्या संकुलातील गांधी पुतळ्यासमोर ‘मोदी जी, चीनवर मौन कधी सोडणार ?’ असे फलक हातात घेऊन निदर्शने केली.