Bageshwar Dham : जया किशोरीशी लग्न करणार ? बागेश्वर महाराज म्हणाले…

Bageshwar Dham : जया किशोरीशी लग्न करणार ? बागेश्वर महाराज म्हणाले…

छतरपूर : मध्य प्रदेशातील बागेश्वरधामचे (Bageshwardham) गदाधारी धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) यांना एका वाहिनीने मोटीवेशनल स्पीकर जया किशोरी यांच्याशी तुम्ही लग्न करणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की, माझ नाव कुणाशीही जोडू नका. मी आजपर्यंत कोणाशीही बोललेलो नाही आणि मी जया किशोरी यांच्याकडे बहिणीच्या दृष्टीने पाहतो. तर मी कधीही त्यांना भेटलेलो नाही. असंही ते म्हणाले.

याच मुलाखतीमध्ये बागेश्वरधामचे (Bageshwardham) गदाधारी धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) यांनी सांगितले की ते आता गृहस्थामात प्रवेश करणार आहेत. त्यांना तशी परवानगी त्यांच्या गुरूंकडून मिळाली आहे.

मध्य प्रदेशातील बागेश्वरधामचे (Bageshwardham) गदाधारी धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेत आहेत. ते सर्वसामान्य हिंदूंची फसवणूक करतात आणि अंधश्रद्धा पसरवीत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Superstition Eradication Committee) संस्थापक प्रा. श्याम मानव (shyam manav) यांनी केला होता. यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

धीरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती होती. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. वारंवार येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

मध्य प्रदेशातील बागेश्वरधामचे गदाधारी धीरेंद्र कृष्ण महाराज हे सर्वसामान्य हिंदूंची फसवणूक करतात. स्त्रियांच्या चारित्र्याचे हनन करतात आणि आस्थेला अंधश्रद्धेत बुडवित असल्याचा आरोप करत, आम्ही नव्हे तर हे महाराजच सनातन हिंदू धर्माचे नुकसान करीत असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube