LGBTQ & Work Load : कामाचा अतिताण लोकांना समलैंगिक बनवतोय; मलेशियन मंत्र्याचा विचित्र दावा
LGBT अति कामाच्या दबावामुळे एखाद्याला समलैंगिक" बनवता येते का? असं ऐकल्यानंतर तुमचेही कान टवकारले ना? असं खरचं होत?
LGBTQ & Work Load Connection What Malaysian Minister Says : अति कामाच्या दबावामुळे एखाद्याला समलैंगिक” बनवता येते का? असं ऐकल्यानंतर तुमचेही कान टवकारले ना? असं खरचं होत? अति कामाच्या दबावामुळे एखाद्याला समलैंगिक” बनवता येते का? असं ऐकल्यानंतर तुमचेही कान टवकारले ना? सध्या या विचित्र दाव्याची जोरदार चर्चा सुरूये. हा दावा करणारी व्यक्ती कुणी साधीसुधी नाही तर, एका देशाची मंत्री आहे. मंत्र्यांच्या या विचित्र दाव्यामुळे हे मंत्री महाशय सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहेत.
विचित्र दावा करणारे मंत्री महोदय कोण?
मलेशियातील विरोधी पक्षाच्या पीएएस खासदार सिती झैलाह मोहम्मद युसुफ यांनी संसदेत एक प्रश्व विचारला होता. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाचे धार्मिक व्यवहार मंत्री डॉ. झुल्किफली हसन यांनी वरील दावा एका लेखी उत्तरात केला आहे. कामाचा ताण, सामाजिक वातावरण आणि लैंगिक अनुभव, कामाशी संबंधित ताण आणि वैयक्तिक घटक हे सर्व एलजीबीटी वर्तनाची संभाव्य कारणे मानली जाऊ शकतात. वाढता कमाचा ताण लोकांना एलजीबीटी समुदायाकडे ढकलू शकतो असेही हसन यांनी यांनी म्हटलयं. मंत्र्यांच्या या दाव्यानंतर सध्या ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
मलेशियामध्ये समलैंगिकतेला गुन्हा ठरवण्यात आला असून, मंत्र्यांचे विधान LGBTQ समुदायातील ट्रेंड, वय, वांशिकता आणि हिंसाचाराच्या कारणांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय चौकशीचा भाग होते. 2022 ते 20250 दरम्यान, LGBTQ संबंधित 135 घटना घडल्या ज्यामुळे अटक किंवा खटले दाखल झाले आहे.
माझ्या ऑफिसमधील संपूर्ण टीम अजून समलैंगिक का नाही झाली?
हसन यांच्या या दाव्या सोशल मीडियावर नेटकरी मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. त्यात एका यूजरने म्हटले आहे की, “जर कामाच्या ताणामुळे लोक समलैंगिक बनतात, तर मला आश्चर्य वाटते की, माझ्या संपूर्ण ऑफिस टीम अजून समलैंगिक कशी नाही झाली असा प्रश्न उपस्थि केला आहे तर, दुसऱ्या यूजरने 4 दिवसांचा कामाचा आठवडा लागू करा… जेणेकरून ‘कमी लोक समलिंगी असतील असा सल्ला दिला आहे.
मंत्र्यांच्या दाव्यावर मानवाधिकार संघटनांनी काय म्हटले?
LGBTQ हक्क गटांनी मंत्र्यांच्या विधानाला दिशाभूल करणारे आणि वैज्ञानिकदृष्ट्या निराधार म्हटले आहे. जस्टिस फॉर सिस्टर्स गटाच्या थिलागा सुलाथिरेह म्हणाल्या की, लैंगिक प्रवृत्ती हा मानवी ओळखीचा एक नैसर्गिक भाग आहे. तो ताणतणाव किंवा बाह्य दबावामुळे बदलत नाही.
