तणाव वाढला ! चीनची खोडी, तैवानभोवती चीनी विमानांच्या घिरट्या
China Taiwan Tension : तैवान आणि चीनमधील (China Taiwan Tension) वैर सर्वश्रुत आहे. चीनकडून नेहमीच तैवानवर दावा सांगितला जातो. मात्र, तैवानी राज्यकर्ते आणि तेथील जनता चीनच्या या दडपशाहीला नेहमीच विरोध करत आले आहेत. चीन विरोधात त्यांना अमेरिकेचीही (America) साथ मिळत आहे. त्यामुळे चवताळलेला चीन (China) नेहमीच काहीना काही तरी खोड्या काढत असतो. आताही चीनने अशीच आगळीक केली आहे ज्यामुळे तैवान संतापला आहे.
चीनचा संपूर्ण जगाला धोका; छोट्याशा देशानं ‘ड्रॅगन’ला ललकारलं
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले, की एक चीनी पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर आणि तीन युद्धनौका तैवान भोवतीच्या परिसरात आढळून आल्या. तैवानच्या आसपास एक पीएलए विमान आणि तीन जहाजे आज सकाळी सहा वाजता सापडली. त्यानंतर संरक्षण दलांनी परिस्थितीचे निरीक्षण केले. या घडामोडी पाहता विमाने, नौदलाची जहाजे आणि जमिनीवर आधारीत क्षेपणास्त्रे सक्रिय करण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन या अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे प्रवक्ते केविन मॅक्कार्थी यांना भेटल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने हे वक्तव्य केले आहे. या भेटीमुळे चीन आधीच संतप्त झाला असून त्याने प्रत्युत्तर देण्याची धमकीही दिली होती.
चीनच्या समुद्री अधिकाऱ्यांनी याआधी सांगितले होते की अधिक तपशील न देता या बेटाला चीनपासून वेगळे करण्याऱ्या पाण्यात गस्त वाढविण्यात येणार आहे. चीनने केलेली ही कृती विनाकारण तणावात वाढ करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हे क्रॉस-स्ट्रेट शिपिंग कराराचे आणि सागरी सरावाचे स्पष्ट उल्लंघन आहे. ज्यामुळे दोन्ही बाजूंच्या सामान्य वाहतुकीवर गंभीर विपरीत परिणाम होतील असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, चीन आणि तैवानमधील तणाव वाढत चालला आहे. तैवानवरील हक्क चीनकडून केला जात असला तरी तैवान यासाठी तयार नाही. त्यात आता तैवानला चीनची साथ मिळत आहे. त्यामुळे चीनच्या अडचणी वाढल्या आहेत. ज्यावेळी तैवानचे राजकीय व्यक्ती किंवा येथील अधिकारी अमेरिकेचा दौरा करतात किंवा तेथील नेत्यांना भेटतात त्यावेळी चीनकडून अशा खोड्या काढल्या जातात.