भारताची डोकेदुखी वाढणार! तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसऱ्यांदा एर्दोगन विराजमान
Turkey New President : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देत नेहमीच भारताविरोधात कारवाया करणाऱ्या तुर्कीच्या (Turkey New President) राष्ट्राध्यक्षपदी रेचेप तैयप एर्दोगन (Tayyip Erdogan) यांनी शपथ घेतली. एर्दोगन तिसऱ्यांदा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे, याआधी त्यांनी तीन वेळेस देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. या घडामोडींमुळे भारताची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. कारण, एर्दोगन यांनी नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे. काश्मीर मुद्द्यावर तर त्यांनी उघडपणे पाकिस्तानचे समर्थन करत भारतावर टीका केली होती.
मागील आठववड्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड करण्यात आली. यासह नाटो सदस्य देशांत त्यांची वीस वर्षांची सत्ता आणखी पाच वर्षांसाठी वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला. एर्दोगन पंतप्रधान म्हणून सत्तेत राहिल्यानंतर 2003 पासून देशाचे अध्यक्ष आहेत. साडेआठ कोटी लोकसंख्या असलेल्या तुर्कस्तानमध्ये अमेरिकेनंतर नाटोमध्ये सर्वाधिक सैन्य आहे. लाखो निर्वासित लोकांनी या देशात आश्रय घेतला आहे.
पाकिस्तान घाबरला! भारताच्या नव्या संसदेत घडला ‘हा’ प्रकार
युक्रेनच्या धान्याच्या वाहतुकीच्या करारामध्ये मध्यस्थी करून जागतिक अन्न संकट टाळण्यात या देशाने मोठी भूमिका बजावली होती. एर्दोगन यांनी प्रेसिंडेशियल पॅलेस कंपाउंडमध्ये शपथविधी समारंभाच्या आधी संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. यानंतर आता शपथविधी सोहळ्यासाठी परदेशातून डझनभर पाहुणे उपस्थित राहणार आहेत. समाचार एजन्सी अनादोलु मते, समारोहात सहभागी होणाऱ्या नेत्यांत अजरबैजान, व्हेनेझुएला, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, लीबिया या देशांचे प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
एर्दोगन यांच्यासमोरील आव्हाने
नाटोची इच्छा आहे की 11-12 जुलै रोजी लिथुआनियात होणाऱ्या बैठकीच्या आधी स्वीडनला सदस्यता देण्यात यावी. एर्दोगन यांच्यासमोर हे मोठे आव्हान असणार आहे. तसेच देशाची खराब आर्थिक स्थिती, लाखो सिरियाई शरणार्थींना पुन्हा त्यांच्या देशात पाठवणे, भुकंपामुळे उद्धवस्त झालेल्या दक्षिण भागाचे पुनर्निर्माण या आव्हानांचा सामना एर्दोगन यांना करावा लागणार आहे. तुर्कीमध्ये सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. मागील महिन्यात महागाईचा दर 55 टक्के होता. मागील वर्षात देशातील महागाई 88 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती.
दहशतवादी जगाला का घाबरत आहेत? आयएसआयच्या प्लॅनमुळे दाऊद-हाफिजवर मृत्यूचे सावट