मुंबईतील कोस्टल रोडवरच्या बोगद्यात कार पेटली, दोन्ही बाजू वाहतुकीसाठी केल्या खुल्या

या घटनेचा एका व्हिडीओही समोर आला असून बोगद्याच्या आतमध्ये शेकडो गाड्या एकमेकांमागोमाग अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.

News Photo   2026 07 15T141314.501

मुंबईतील कोस्टल रोडवर अपघात झाला आहे. (Mumbai) गाड्यांची एकमेकांना टक्कर झाली असून एका गाडीला आतमध्ये आग लागल्याचं वृत्त आहे. तेथे अनेक गाड्या अकडून पडल्या असून आगीमुळे धूरही येत आहे. नरीमन पॉईंटवरून कोस्टल रोडच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. या घटनेचा एका व्हिडीओही समोर आला असून बोगद्याच्या आतमध्ये शेकडो गाड्या एकमेकांमागोमाग अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण आपापल्या गाड्यांमधून खाली उतरून पळाले आहेत.

या अपघातानंतर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. अनेकजन भीतीने आपल्या गाड्या आहे त्या जाग्यावर सोडून पळाले होते. आता प्रशासनाे पूर्ण खबरदारी घेत यामध्ये मार्ग काढला आहे. वाहतुक कोंडी फोडली आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी मार्ग खुला केला आहे.

मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात; एका कारला आग, वाहतूक पूर्णपणे ठप्प

मुंबईतील अत्यंत महत्वाचा असा वाहतूक मार्ग म्हणजे कोस्टल रोड. याच कोस्टल रोडलवर जिथे बोगदा सुरू होतो, त्याचा ठिकाणी हा दुर्दैवी अपघात झाला. या भीषण अपघातामुळे कोस्टल रोडवरून धावणाऱ्या जवळपास 450 ते 500 हून अधिक गाड्या या ठिकाणी अडकून पडल्या आहेत. या घटनेनंंतर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली, तसेच अग्निशमन दलाला, अँब्युलन्सलाही फोन करण्यात आला आहे.
ट्राफिक वुभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तिथे यावं आणि बोगद्यात अडकलेल्या गाड्यांना मार्गदर्शन करून, त्यांना तिथून वेगळा मार्ग तयार करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

त्याचबरोबर अग्निशमन दलाला देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे. लवकरात लवकर येईन त्यांनी गाड्यांना लागलेली आग विझवावी अशी मागणी करण्यात आली. थोड्याच पोलिस तसेच ट्राफिक दलाचे अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल आणि त्यांनी असून तिथे अडकलेल्या गाड्यांना मार्गदर्शन केलं. हळूहळू त्या गाड्या रिव्हर्स घेऊन बाहेर काढत मार्ग मोकळा केला गेला. वरळी ते मरीन लाईन्स इथपर्यंत 11 किमीचा हा साधारण कोस्टल रोड आहे. दरम्यान कोस्टल रोडवर कारला झालेल्या अपघातामुळे पेडर रोड आणि भुलाभाई देसाई रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

follow us