मुंबईच्या कोस्टल रोडवर भीषण अपघात; गाडीने लगेच गाठला तळ, काय घडलं?

या अपघातात फ्रशोगर किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पोलिसांनी जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Costal

मुंबईतील कोस्टल रोडवर इर्टिका गाडीचा भीषण अपघात झाला. (Mumbai) वरळी कोस्टल रोडचा डिवायडर तोडून 30 फूटावरून गाडी थेट खोल समुद्रात पडली. सोमवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा ही घटना घडली, असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. गस्तीवरील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत चालकाचे प्राण वाचवले. फ्रशोगर दरायुश बत्तीवाला 28 असे या तरुणाचे नाव असून वरळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात फ्रशोगर किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पोलिसांनी जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 30 फूटावरून पाण्यात पडलेल्या गाडीने काही क्षणात तळ गाठल्याने गाडी अजूनही समुद्रातच आहे. चालक महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने वेगाच गाडी चालवत असताना, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली गाडी वेगात असल्याने थेट डिवायडरला धडक देत ती पाण्यात गेल्याची माहिती गस्तीवरील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी दिली.

Breaking News! विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात! दोन दिवसांपूर्वीच झाला रश्मिका मंदानाशी साखरपुडा

चालकाने मद्यप्राशन केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून अधिक तपास वरळी पोलिस करत आहेत. वरळी सी-लिंकवर 9 सप्टेंबर 2025 रोजी एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला. सागरी किनारा मार्ग (Coastal Road) आणि वरळी सी-लिंकच्या कनेक्टिंग पॉईंटजवळ हा अपघात झाला होता. काही पोलीस कर्मचारी व्हीआयपी बंदोबस्तासाठी तैनात होते.

रस्त्यावरुन भरधाव वेगात जात असलेल्या एका कारने या पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. या अपघातात एका पोलीस हवालदाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव दत्तात्रय कुंभार असे आहे. ते वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गाडीच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते.

follow us

संबंधित बातम्या