अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमींमध्ये शिवसेनेची नगरपरिषदेची महिला उमेदवार
Accident अंबरनाथच्या उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. यात चौघांचा जागीच मृत्यू, तीन जखमींमध्ये शिवसेनेच्या नगरपरिषदेच्या उमेदवार किरण चौबे आहेत
Accident on Ambernath flyover; Four dead, three seriously injured, Shiv Sena’s woman candidate for municipal council : राज्यामध्ये एकीकडे नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबरनाथच्या उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नगरपरिषदेच्या उमेदवार किरण चौबे देखील असल्याचं सांगितलं जात आहे. चौबे या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये बुवापाडा प्रभागातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. प्रचार संपवून घरी जात असताना हा प्रकार घडला आहे.
अपघात नेमका कसा घडला?
कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकीस्वारांना या कारणे जोरदार धडक दिली. या धडकेत अंबरनाथ पालिकेचे दोन कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे तसेच कारचालक लक्ष्मण शिंदे आणि एक पादचारी सुमित चेलानी या चौघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. ज्यामध्ये किरण चौबे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या घटनेच्या तपास सुरू आहे.
