अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा कायम, विखेंची दुसरी बैठकही निष्फळ; शेतकऱ्यांचा महामार्ग बंदचा इशारा
Ahmednagar Sugarcane Price : अहिल्यानगरमध्ये ऊसदरावर तोडगा न निघाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, दर जाहीर न झाल्यास दिला इशारा.
Ahmednagar Sugarcane Price : अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊसदराचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली दुसरी बैठकही कोणताही ठोस निर्णय न होता संपली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधील नाराजी आणखी वाढली आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊसाचा दर निश्चित करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, साखर कारखानदार आणि शेतकरी यांच्यात दराबाबत एकमत होत नसल्याने हा प्रश्न अधिकच चिघळला आहे.
बैठकीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या चेअरमनना उद्या सायंकाळपर्यंत ऊसदर निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. साखर कारखाने सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने दर निश्चित करण्यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. त्यानंतर ऊसदराचा अंतिम निर्णय घेण्याबाबत कारखानदारांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
विशेष म्हणजे या महत्त्वाच्या बैठकीला जिल्ह्यातील केवळ दोन ते तीन साखर कारखान्यांचे चेअरमन उपस्थित होते. त्यामुळे सर्व कारखानदारांशी चर्चा होऊ न शकल्याने ऊसदराचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला. बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. ऊसदराचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करत त्यांनी प्रशासन आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधले.
दरम्यान, उद्या सायंकाळपर्यंत ऊसदर निश्चित न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. यामध्ये ऊस वजनासाठी वापरण्यात येणारे काटे बंद पाडणे, साखर कारखान्यांचे कामकाज रोखणे आणि जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर वाहतूक बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न आता आंदोलनाच्या वळणावर पोहोचला आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी