मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा उद्या राजीनामा होणारच?, सीजेपीच्या दोन मागण्या मान्य
कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यात नुकताच बैठक पार पडली. सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर बाहेर आल्यावर साैरभ दास यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार (CJP) यांच्यात नुकताच बैठक पार पडली. सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर बाहेर आल्यावर साैरभ दास यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर तडजोड होणार नाही. आम्ही त्यांना बैठकीत स्पष्ट सांगितलं. 3 पैकी 2 मागण्या सरकारने मान्य केल्या. सरकारने दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ मागितली आहे. पुन्हा एकदा सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीची बैठक होणार आहे.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आमची सर्वात महत्वाची मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर उद्या 2 वाजेपर्यंत सरकार निर्णय घेईल. 1 तास सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. सरकारकडून तात्काळ 3 पैकी 2 मागण्या मान्य केल्या. त्यामध्येच दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर 2 पर्यंत वेळ सरकारने मागितला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, असं स्पष्ट शब्दात साैरभ दास यांनी म्हटलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आमच्या मागणीबाबत सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. सरकार त्यांना लवकरच पदावरून दूर करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
सरकारने दोन मागण्यांना मंजुरी दिली आहे. नुकसानभरपाई देणे आणि विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले 11 एफआयआर व कायदेशीर खटले मागं घेणे, हे त्यांनी मान्य केलं. आता धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का? हे पाहण्यासारखं ठरणार आहे. सरकारने आंदोलकांच्य दोन मागण्या पूर्ण केल्या. मात्र, अजूनही 1 मोठी आणि महत्नाची मागणी तशीच आहे. आता उद्या यावर फैसला होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
आज हम आंदोलनकारी लोगों के विषयों पर चर्चा करने के लिए यहां आए थे, बातचीत लगभग दो घंटे चली।
सरकार की ओर से मैं और मेरे साथ भारत सरकार के मंत्री डॉ. जितेन्द्र सिंह जी बातचीत में शामिल हुए।
उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुईं और कई दृष्टि से सभी बातों पर हर… pic.twitter.com/pnRoyylCOl
— BJP (@BJP4India) July 24, 2026
#WATCH | Delhi: A meeting held between Union Ministers JP Nadda and Jitendra Singh, and Cockroach Janta Party's Chief Spokesperson Saurav Das and its National Spokesperson Ashutosh Ranka. pic.twitter.com/AYMu9RD8d8
— ANI (@ANI) July 24, 2026