BRICS Summit : फालुन गोंग आणि तिबेटी माध्यमांवर निर्बंधासाठी चीनचा दबाव आणि माध्यम स्वातंत्र्याची कसोटी

12, 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत चिनी शिष्टमंडळाला माध्यमांकडून अडचणीत आणणारे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता.

  • letsupteam
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 12T134627.838

आनंद पोफळे : मुक्त पत्रकार

China’s pressure on India : नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर फालुन गोंग आणि तिबेटी गटांशी संबंधित माध्यम संस्थांच्या प्रवेशाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मुक्त पत्रकार आनंद पोफळे यांनी यासंदर्भात लेख लिहिला असून, या लेखातील काही संदर्भ ‘द प्रिंट’ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखातून घेण्यात आले आहेत. पोफळे यांच्या लेखानुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले असताना फालुन गोंग आणि तिबेटी गटांशी संबंधित माध्यम संस्थांचा ब्रिक्स परिषदेमधील प्रवेश मर्यादित करण्यासाठी चिनी दूतावासाकडून दबाव आणला जात असल्याची माहिती ‘द प्रिंट’ने दिली आहे.

12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत चिनी शिष्टमंडळाला या माध्यमांकडून अडचणीत आणणारे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ चिनी दूतावास अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी केल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे. मात्र ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असल्याने परिषदेत माध्यमांना प्रवेश देण्याचे आणि त्यासंदर्भातील नियंत्रणाचे अधिकार भारत सरकारकडे आहेत. फालुन गोंग ही एक आध्यात्मिक ध्यान पद्धती असून चीनमध्ये 1999 पासून तिच्यावर बंदी आहे. सत्य, करुणा आणि सहनशीलता या तत्त्वांवर आधारित असलेल्या या साधनेचा प्रसार ली होंगजी यांनी 1992 मध्ये चीनमध्ये केला.

मनोज जरांगेंची मोठी घोषणा; आंदोलकांचा मोर्चा घेऊन मुंबईला जाणार

फालुन गोंगचा प्रभाव वाढल्यानंतर जुलै 1999 मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाने या साधनेविरोधात देशव्यापी मोहीम सुरू केल्याचे लेखात म्हटले आहे. त्यानंतर ॲम्नेस्टी इंटरनॅशनलसह अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी फालुन गोंग साधकांची स्थानबद्धता, तुरुंगवास, छळ आणि इतर अत्याचारांबाबत आरोप नोंदवले आहेत. फालुन गोंग आणि तिबेटशी संबंधित अनेक माध्यम संस्थांवर चीनमध्ये बंदी असली, तरी भारतात स्थानिक नियम आणि कायद्यांचे पालन करणाऱ्या माध्यम संस्थांना मुक्तपणे काम करण्याची मुभा आहे.

भारतामध्ये, विशेषतः धरमशाळेत मोठ्या संख्येने तिबेटी निर्वासित वास्तव्यास आहेत. या समुदायाशी संबंधित अनेक माध्यम संस्थाही कार्यरत आहेत. ‘रेडिओ फ्री एशिया’चे भारतात प्रतिनिधी असून ‘व्हॉइस ऑफ तिबेट’ हीदेखील धरमशाळेतून कार्यरत असलेली प्रमुख माध्यम संस्था असल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे. तसेच ‘फ्रीडम हाऊस’च्या संशोधनाचा संदर्भ देत चीनच्या सीमेपार दडपशाहीच्या प्रयत्नांचा फटका फालुन गोंग साधकांनाही बसल्याचा उल्लेख पोफळे यांनी आपल्या लेखात केला आहे.

बॅकअप कार, फूड टेस्टिंग टीम अन् डॉक्टर… शी जिनपिंग यांची BRICS साठी सुरक्षा व्यवस्था काय?

या पार्श्वभूमीवर ब्रिक्स शिखर परिषदेकडे केवळ भारत-चीन संबंध, सीमा स्थिरता आणि आर्थिक सहकार्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर माध्यम स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. फालुन गोंगचा मुद्दा हा केवळ एका आध्यात्मिक समुदायापुरता मर्यादित नसून सद्सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, माध्यमांचे स्वातंत्र्य, मानवाधिकार आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व यांसारख्या व्यापक मुद्द्यांशी जोडलेला असल्याचे आनंद पोफळे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. त्यामुळे चीनसोबतचे संबंध आणि सहकार्य कायम ठेवतानाच माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत भारत काय भूमिका घेतो, याकडेही लक्ष लागले आहे.

follow us