मोठी बातमी : पक्षघटनेतील बदलांबाबत कागदपत्रे द्या; सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचे पत्र

Election Commission Sends Letter to Sunetra Pawar सुनेत्रा पावारांना पक्षाच्या घटनेत केलेल्या दुरुस्त्यांबाबत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचे पत्र; पक्षघटनेतील बदलांबाबत कागदपत्रांची मागणी

Election Commission Sends Letter to Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एक महत्त्वाचे पत्र पाठवण्यात आले असून, पक्षाच्या घटनेत करण्यात आलेल्या दुरुस्त्यांबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हे पत्र पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी : रणनीतीकार ते आमदार… प्रशांत किशोर यांनी भाजपचा तीन दशकांचा अभेद्य गड भेदला !

माहितीनुसार, आयोगाने 27 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नावे हे पत्र पाठवले आहे. या पत्रात 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षघटनेतील कलम क्रमांक 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये करण्यात आलेल्या बदलांना मंजुरी देणारे आवश्यक प्रस्ताव आणि त्यासंबंधीची वैध कागदपत्रे आयोगाला अद्याप प्राप्त झालेली नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने या दुरुस्त्यांची अधिकृत नोंद करण्यासाठी संबंधित ठराव, बैठकीचे इतिवृत्त, मंजुरीची कागदपत्रे आणि इतर आवश्यक पुरावे सादर करण्याची सूचना पक्षाला केली आहे. आयोगाकडून अशा प्रकारची कागदपत्रे मागवणे ही निवडणूक आयोगाच्या नियमित प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रियेचा भाग असल्याचेही समजते.

Bankipur Result : भाजपचा 30 वर्षांचा अभेद्य किल्ला भेदणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या विजयाचं विश्लेषण

राष्ट्रीय कार्यकारिणीत झाले होते बदल

अजित पवार यांच्या निधनानंतर 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावेळी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याच बैठकीत पक्षाच्या संविधानातील काही महत्त्वाच्या कलमांमध्ये दुरुस्ती करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.

या दुरुस्त्यांमध्ये पक्षाच्या संघटनात्मक रचनेशी आणि प्रशासकीय कार्यपद्धतीशी संबंधित कलम क्रमांक 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये बदल करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, या बदलांना मान्यता देणारी अधिकृत कागदपत्रे आयोगाकडे सादर झालेली नसल्याने आयोगाने त्याबाबत स्पष्टीकरण आणि आवश्यक दस्तऐवज मागितले आहेत.

सरकारकडून दिलेले आश्वासन पाळण्यात विलंब; अभिजीत दिपके विद्यार्थ्यांसह पुन्हा मैदानात उतरणार

तांत्रिक प्रक्रियेचा भाग

या पत्रामुळे कोणतीही तातडीची कायदेशीर कारवाई किंवा पक्षाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे संकेत नाहीत. उलट, पक्षघटनेत केलेल्या बदलांची अधिकृत नोंद आणि पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राबवली जाणारी ही नियमित तांत्रिक प्रक्रिया असल्याचे मानले जात आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोगाने मागवलेली कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर केल्यानंतर या प्रक्रियेची पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे या पत्राकडे राजकीयपेक्षा प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

साहेब माझा राजीनामा आपण स्विकारावा…, खासदार श्रीकांत शिंदेंच्या विरोधीत लढलेल्या दरेकर यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र

follow us