Video : आज 31 डिसेंबर! पुणे-मुंबईसह देशातील महत्वाच्या शहरात पोलीस तैनात, दिला कडक इशारा

आज 31 असल्याने राज्यभरासह देशातही अनेक शहरांत पार्ट्या रंगतात. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 31T122418.944

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे (News Year) स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक यांसह देशभरात ठिकठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेला कोणतेही गालबोट लागू नये आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा हिरमोड होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.

मुंबईसारख्या ठिकाणी दरवर्षी होणारी अलोट गर्दी लक्षात घेता गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी यांसारख्या स्थळांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रात केवळ स्थानिकच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकाराला घडू नये यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

वंचितने दिला काँग्रेसला धक्का, मुंबईत तब्बल 16 जागांवर उमेदवारच नाही; कारण काय?

मुंबईच्या रस्त्यांवर कालपासूनच पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी उत्साहात पण शिस्तीत नवीन वर्षाचे स्वागत करावे, यासाठी विविध भागात बॅरिकेटिंग आणि विशेष तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण देश सज्ज झाला असून, ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री सुरक्षितता राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.

मुंबईत विशेषतः गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह आणि जुहू चौपाटी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी शहर आणि उपनगरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १७,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. यामध्ये राज्य राखीव पोलीस दल (SRPF) आणि क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) यांसारख्या विशेष तुकड्यांचाही समावेश आहे.

तसेच छेडछाड आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात असणार आहेत. तसेच मुख्य नियंत्रण कक्षातून शहरभर पसरलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाईल. त्यासोबतच पुणे आणि नाशिक या शहरांमध्येही मुख्य बाजारपेठा आणि सेलिब्रेशन पॉईंट्सवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.

पोलिसांचं आवाहन

दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ १०० किंवा ११२ वर संपर्क साधावा. सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी किंवा स्टंट करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. तरी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करून उत्साहात पण नियमात राहून नवीन वर्षाचे स्वागत करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल

दक्षिण मुंबई: मरिन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या प्रवेशावर मर्यादा असतील. काही रस्ते नो पार्किंग आणि वन वे करण्यात आले आहेत.

पश्चिम उपनगरे: जुहू आणि वांद्रे बँडस्टँड परिसरात सायंकाळनंतर वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी डायव्हर्सन्स देण्यात आले आहेत.

ड्रिंक अँड ड्राईव्ह: मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध Zero-Tolerance धोरण राबवले जाईल. ठिकठिकाणी नाकाबंदी करून ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाईल.

 

follow us