सीजेपीच्या आंदोलनाआधीच राजधानी दिल्लीत हाय अलर्ट, ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् सीमांवर बीएसएफचा वेढा

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या हाकेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 10T075250.763

High alert in the capital, Delhi, even before the CJP’s protest : दिल्लीतील जंतर-मंतरवर 10 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या हाकेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने तणाव वाढला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी व्यापक सुरक्षा आराखडा तयार केला असून, राजधानीत 20 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येत आहेत. जंतर-मंतर, जनपथ, निवडणूक आयोगाचं कार्यालय आणि दिल्ली पोलीस मुख्यालय परिसर अतिसंवेदनशील घोषित करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी 300 हून अधिक अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, जंतर-मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर अनेक स्तरांमध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे.

आंदोलनासाठी येणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 12 डिटेंशन सेंटर्स तयार केल्याची माहिती आहे. दरम्यान, विविध राज्यांतून दिल्लीकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना रोखलं जात असून, काहींना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप सीजेपीच्या नेत्यांनी केला आहे. दुसरीकडे, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

शेवगाव आर्थिक फसवणूक प्रकरण, आरोपी संदीप सुधाकर थोरातचा उपचारादरम्यान मृत्यू

आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली मेट्रोच्या 45 स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे गेट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. हे निर्बंध 9 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजल्यापासून 10 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय, देशभरातून दिल्लीकडे येणाऱ्या 38 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचाही दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, आंदोलन रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाईवर अभिजीत दिपके यांनी सरकारवर टीका करत थेट आणीबाणीच्या काळाची आठवण करून दिली. आंदोलनाला परवानगी नाकारणं आणि कार्यकर्त्यांना रोखणं, हे लोकशाही अधिकारांवर गदा आणणारं असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू झालेला हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, जंतर-मंतरवरील घडामोडींकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

follow us