सुरक्षा यंत्रणांना चकवा देत PM मोदींच्या घरापर्यंत राहुल गांधी कसे पोहचले? वाचा आंदोलनाचा सिक्रेट प्लॅन

Rahul Gandhi : नीट पेपर फुटी प्रकरणात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी

Rahul Gandhi

Rahul Gandhi : नीट पेपर फुटी प्रकरणात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करत अनेकांना धक्का दिला आहे. जवळपास तीन तास चालेल्या या आंदोलनात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर दुसरीकडे जंतर मंतरवर सुरु असणाऱ्या आंदोलनामुळे पंतप्रधान मोदी यांच्या निवसास्थानी मोठ्या प्रमाणात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे मात्र असं असून देखील राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार पंतप्रधान मोदी यांच्या निवसास्थानी कसे पोहचले याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या प्लॅनची माहिती शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच दिली नव्हती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पंतप्रधान मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन करायचा आहे याची माहिती काँग्रेस खासदारांना (Congress MP) नव्हती. जर खासदारांना याबाबत माहिती दिली तर ही माहिती पत्रकारांपर्यंत किंवा पोलिसांपर्यंत पोहण्याची शक्यता असल्याने राहुल गांधी यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही याबाबत माहिती दिली नाही. राहुल गांधींच्या या प्लॅनबाबत फक्त काही त्यांच्या जवळच्या नेत्यांनाच माहिती होती.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या निवासस्थानापासून पंतप्रधान मोदी (PM Modi) यांचे निवासस्थान 500 मीटर अंतरावर आहे. काँग्रेसच्या खासदारांना आपल्याला खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जायचे आहे असं सांगण्यात आले होते. खरगे यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांना सांगण्यात आले की, कोणताही प्रश्न न विचारता राहुल गांधी यांच्या ताफ्याच्या मागे चला. यानुसार, राहुल गांधी यांच्या पाठीमागे काँग्रेस खासदार चालतचालत पंतप्रधान मोदी यांच्या घरापर्यंत पोहोचले. पंतप्रधान मोदी यांच्या घरापर्यंत पोहचल्यानंतर आपल्याला इथेच आंदोलन करायचे असल्याची माहिती राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदारांना दिली. यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलनाची सुरुवात केली.

आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत आणि काँग्रेसचे आणखी काही नेत्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत पोहचली. यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव देखील राहुल गांधी यांच्या आंदोलनात सामील झाले. अचनाक आंदोलनाची सुरुवात झाल्याने पंतप्रधान मोदी यांच्या निवसास्थानी सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती.

चर्चेसाठी तयार पण त्यांनी राजकीय तमाशा निवडला; राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान स्पष्टच बोलले

यानंतर मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी देखील राहुल गांधींशी त्यांच्या मागण्याबाबत विचारणा केली मात्र राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर ते निघून आले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांनी बळाचा वापर करत हटवण्याचा प्रयत्न केला.

follow us