2029 ला मला उमेदवारी… जय पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले पुन्हा पवार विरूद्ध पवार…

Jay Pawar यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या निवडणुकीमध्ये उतरण्यावर सूचक विधान केलं आहे.

Jay Pawar

Jay Pawar gives hint of his Candidacy in 2029 Assembly Election from Baramati : एकीकडे आज राज्यामध्ये राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाला सुरूवात झाली. यावेळी पवार स्वत: उपमुख्यमंत्री आणि उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत काटेवाडी या त्यांच्या गावी मतदान केलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर जय पवार यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या निवडणुकीमध्ये उतरण्यावर सूचक विधान केलं आहे.  तर 2029 ला देखील पवार विरूद्ध पवार लढत होऊ शकते. असं म्हणत रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

2029 ला जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

बारामतीमधून 2029 ला मी उमेदवार असावं असं बारामतीकरांना वाटतं, ही लोकांची इच्छा आहे. माझी अपेक्षा आहे की, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं. मात्र ती लोकांची ती इच्छा आहे. असं म्हणत जय पवार यांनी एकीकडे सुनेत्रा पवार या पोटनिवडणूक लढवत असताना आपल्या निवडणुकीमध्ये उतरण्यावर सूचक विधान केलं आहे.

पडद्यावर सुपरहिट आणि खऱ्या आयुष्यातही घट्ट मैत्री! डेविड धवन यांच्या सलमान खान एवढा जवळचा का?

त्याचबरोबर त्यांनी इतर प्रश्नांची देखील उत्तर दिली. ते म्हणाले की, अजित पवारांच्या अपघातासंदर्भात अहवाल यायला एक वर्ष लागणार आहे. त्याचा तपास लवकरात लवकर करावा त्याची मागणी आम्ही वेगळेवेगळे यंत्रणेकडे करतोय. सीआयडीची टीम देखील चांगलं काम करत आहे. आमचा संपर्क त्यांच्याशी आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे ते त्यात लक्ष घालतील. अपघाता संदर्भात जोपर्यंत खरी माहिती मिळत नाही. तोपर्यंत घातपात की अपघात हे स्पष्ट होणार नाही. मी लोकांची दिशाभूल करणार नाही. आपण तोपर्यंत थांबूया जोपर्यंत कारवाई होत नाही. सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहेत. मी मीडियाच्या समोर येऊन सारखं बोलत नाही.

2029 ला देखील पवार विरूद्ध पवार लढत?

तर दुसरीकडे 2029 च्या निवडणुकीवर बोलताना शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी म्हटलं की, पक्ष जो निर्णय घेतो तो ऐकाव लागतो. त्यांचा पक्ष वेगळा आहे. तसेच 2029 ला काकी उभ्य राहणार नसतील तर जय उभा राहणार असेल तर त्यावेळी होणारी लढाई ही सर्व पक्षांची असेल. त्यामुळे अजित पवारांवेळी आणि लोकसभेला देखील पवार विरूद्ध पवार लढत झाली होती. तशीच आता 2029 ला देखील पवार विरूद्ध पवार लढत होऊ शकते. असं म्हणत रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

follow us