महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; 16 वरिष्ठ IPS-RPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, ठाण्यातील 3 अधिकाऱ्यांना मुदतवाढ

Maharashtra Police Officers Transfer: महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देवेंद्र फडणवीसांच्या गृह विभागाने दिले.

Maharashtra Police Officers Transfer

Maharashtra Police Officers Transfer: महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) गृह विभागाने जारी केले आहेत. या निर्णयानुसार राज्यातील वरिष्ठ IPS आणि RPS अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावर आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. गृह विभागाच्या या निर्णयामुळे पोलीस प्रशासनात महत्त्वाचे फेरबदल झाले आहेत.

पुण्यात FDA ची मिठाई विक्रेत्यांवर मोठी कारवाई; 1188 किलो लाडू-बुंदी, तर 303 किलो बर्फीचा साठा नष्ट

गृह विभागाने 2 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन आदेश काढला. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक 1 च्या शिफारशीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि शिवराज पाटील या तीन अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठाण्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुदतवाढ

या आदेशातील सर्वाधिक चर्चेचा निर्णय म्हणजे ठाण्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेली मुदतवाढ. अमरसिंग जाधव आणि प्रशांत कदम यांना त्यांच्या सध्याच्या पदावर आणखी एक वर्ष काम करता येणार आहे. तसेच शिवराज पाटील यांनाही एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ब्रेकिंग- सातारा जिल्हा बँक निवडणूकीत मंत्री जयकुमार गोरेंना 53 मतं मिळाली; जयकुमार गोरेंकडून त्यांचे बंधू शेखर गोरेंचा पराभव

दुसरीकडे, ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मीना मखवाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत बजबळे यांचीही ठाणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणाची कुठे बदली? पाहा महत्त्वाचे बदल

अनमोल मित्तल – अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, बीड

आकांक्षा यादव – उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर

संदीप जाधव – उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, नांदेड

मीना मखवाना – पोलीस उपायुक्त, परिमंडळ 1, ठाणे शहर

वैशाली ईश्वर कडुकर – पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

चेतना तिडके – पोलीस अधीक्षक (अभियान), अमली पदार्थ विरोधी पथक, नागपूर

सूरज गुरव – अपर पोलीस अधीक्षक, नांदेड

नरसिंग यादव – अपर पोलीस अधीक्षक, सातारा

धनंजय अनंत जाधव – पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा

विकास संपत नाईक – अपर पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

संकेत सतीश गोसावी – उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी

कुमार भिकाजी चौधरी – पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक

सुधीर पुंडलिक नांदणवार – उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर, भंडारा

संतोष वैरागडे – उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प, नाशिक

श्रीकांत चंद्रकांत कांकाळ – पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर

शिवराज पाटील- अपर पोलीस अधीक्षक, नांदेड- त्याच पदावर एक वर्ष मुदतवाढ

अमरसिंग जाधव-पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर-त्याच पदावर एक वर्ष मुदतवाढ

प्रशांत कदम-पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 5, ठाणे शहर- त्याच पदावर एक वर्ष मुदतवाढ

जयंत बजबळे- पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे- प्रतीक्षाधीन / पदस्थापना बदल

ब्रेकिंग: सांगली जिल्हा बँक निवडणूक; गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजयी!

दरम्यान, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबतच ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांना देण्यात आलेली मुदतवाढही या आदेशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

follow us