“युद्धात कमावलेले तहात गमावायला नको”; जरांगेंना डॉ. ज्योती मेटे यांचा सल्ला!
Jyoti Mete Appeal to Manoj Jarange शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी मनोज जरांगेंना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.
Jyoti Mete Appeal to Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा 13 वा दिवस आहे. राज्य सरकारने त्यांच्या 12 मागण्या मान्य केल्या आहेत. उर्वरीत 3 मागण्यांवर सकारात्मक विचार करत आहे. अशातच शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी मनोज जरांगेंना उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे.
शिंदेंशी संबंध बिघडण्यामागे संजय शिरसाट; ‘जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती…’ जरांगे थेट बोलले
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले उपोषण आणि त्यांची खालावलेली प्रकृती पाहता त्यांच्या जीविताची चिंता वाटत आहे. त्यामुळे त्यांनी आता आपल्या प्रकृतीचा विचार करून उपोषणाची यशस्वी सांगता करावी, असे आवाहन शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांनी केले.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारने 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्या आहेत, तर उर्वरित तीन मागण्या कायदेशीर असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व मागण्यांकडे एकत्रितपणे पाहण्याऐवजी प्रत्येक मागणीवर सरकारने काय कार्यवाही केली, याचा स्वतंत्रपणे विचार होणे गरजेचे आहे. ज्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत असे वाटते, त्याबाबत मुद्देनिहाय चर्चा करता येईल, असे डॉ. मेटे यांनी सांगितले.
Amruta Fadnavis On Manoj Jarange : मनोज जरांगे माझे भाऊ, त्यांना घरी जेवायला निमंत्रण देते
‘सर सलामत तो पगडी पचास’ या म्हणीचा दाखला देत त्यांनी आंदोलनातून मिळालेले यश टिकविण्याची गरज व्यक्त केली. युद्धात कमावलेले तहात गमावायला नको, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपण आपले कुंकू गमावले आहे. त्यामुळे समाजाचे दुःख आणि या लढ्याची तीव्रता आपल्याला माहिती आहे. या पार्श्वभूमीवर या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार असल्याचे डॉ. मेटे म्हणाल्या.
मराठा आरक्षणासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर; ‘एकही अर्ज प्रलंबित राहू देऊ नका’ विखे पाटलांचे आदेश!
शिवसंग्रामने घटनादुरुस्तीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. त्यातूनच समाजाला 10 टक्के एसईबीसी आरक्षण मिळाले, असा दावा त्यांनी केला. मात्र, सध्याच्या आंदोलनाबाबत समविचारी संघटनांना विचारात घेतले गेले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या असल्याने आंदोलन यशस्वीरीत्या मागे घेण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रभाकर कोलंगडे, अनिल घुमरे, सुहास पाटील, ज्ञानेश्वर कोकाटे, मनोज जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
विनायक मेटेंनीही आरक्षणासाठी दीर्घ लढा दिला
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दिवंगत विनायक मेटे यांनी विद्यार्थी दशेतच अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत सहभाग घेतला होता. त्यानंतर 1996 पासून 2023 पर्यंत आमदार म्हणून त्यांनी सातत्याने सभागृहात तसेच रस्त्यावरची लढाई लढली. त्या काळात आरक्षणाच्या मागणीची टिंगल-टवाळी केली जात होती. आज या लढ्यात आमदार सक्रिय झाले आहेत, ही मोठी उपलब्धी असल्याचे डॉ. मेटे यांनी सांगितले.
मोठी बातमी! राज्यातील ‘या’ दोन समाजाला OBC प्रमाणपत्र मिळणार, मंत्री अतुल सावे यांचा निर्णय
यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या एका आंदोलनाची सांगता दिवंगत विनायक मेटे यांनी केली होती. त्यांच्या आंदोलनात शिवसंग्रामनेही सहभाग घेतला होता. त्यामुळे जरांगे यांच्या सध्याच्या शारीरिक स्थितीचा विचार करून आंदोलनाबाबत पुनर्विचार करावा, असे त्यांनी आवाहन केले.
मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी सरकारकडून झालेल्या कार्यवाहीची आकडेवारी जाहीर केली आहे. आगामी शिबिरांमध्ये अधिकाधिक लोकांना प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. मिळालेले यश कायम ठेवण्यासाठी आता योग्य रणनीती आखणे आवश्यक असल्याचेही डॉ. मेटे यांनी स्पष्ट केले.
कोस्टल रोडला परवानगी मिळते, मग शिवस्मारकाला का नाही?
आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करणाऱ्या डॉ. ज्योती मेटे यांनी शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर नाराजी व्यक्त केली. कोस्टल रोडसाठी पर्यावरणाच्या सर्व परवानग्या मिळाल्या, मग शिवस्मारकासाठी त्या का मिळत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. कोस्टल रोडची आवश्यकता असली तरी शिवस्मारक हा केवळ विकासकामाचा विषय नसून भावनेशी जोडलेला विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे तुम्ही शहाणे व्हा, अन्यथा संपणार..मनोज जरांगे यांचा खुलेआम इशारा
‘मोठी बहीण, मोठी वहिनी आईसमान’
मोठी बहीण आणि मोठी वहिनी आईसमान असते. त्यामुळे त्याच अधिकारवाणीतून आपण मनोज जरांगे पाटील यांना सल्ला देत असल्याचे डॉ. ज्योती मेटे यांनी शेवटी स्पष्ट केले.