जरांगेंना मोठा धक्का; सहकारी, नातेवाईकांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी होणार

Manoj Jarange Patil Income Tax Inquiry मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित नेते, नातेवाईक आणि सहकाऱ्यांची आयकर विभागाकडून चौकशी होणार.

Manoj Jarange Patil Income Tax Inquiry

Manoj Jarange Patil Income Tax Inquiry: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित काही नेते, नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी होणार असल्याचे माहिती समोर आली आहे. आयकर रिटर्न, मालमत्ता, मोठे आर्थिक व्यवहार तसेच व्यावसायिक व्यवहारांची तपासणी केली जाणार असल्याची शक्यता आहे. आंदोलनाशी संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांशी जोडलेल्या व्यावसायिक संस्थांना मिळालेल्या सरकारी कंत्राटांचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र समान नागरी कायदा समितीला धक्का! ‘या’ कारणामुळे निवृत्त न्यायमूर्ती आर सी चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचे माजी सहकारी अजय बारस्कर यांनी केलेले आर्थिक आरोपही चर्चेत आले आहेत. बारस्कर यांनी जरांगे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी संबंधित व्यक्तींच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही केली होती.

बारस्करांचे आरोप काय?

अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जरांगे पूर्वी महत्त्वाच्या चर्चा माध्यमांसमोर करण्याची भूमिका घेत होते. मात्र आता काही चर्चा बंद दाराआड होत असल्याचा दावा बारस्कर यांनी केला आहे. तसेच जरांगेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून टेंडर मिळवल्याचा आणि आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

राहुल बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या तयारीत श्वेता महाले; ऐनवेळी निर्णय फिरला, म्हणाल्या, ‘बरं झालं!’

दरम्यान, बारस्कर यांनी सप्टेंबरमध्ये जरांगे यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत ईडीकडे तक्रार केल्याचेही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आयकर विभाग चौकशी करत आहे, अशी चर्चा आता व्हायला लागली आहे.

follow us