जरांगे खालावले, मराठे पेटले! बीड-जालन्यात जाळपोळीसह मोठा राडा!
Manoj Jarange Patil Protest मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस; प्रकृती खालावल्याने बीड-जालन्यात मराठा बांधव आक्रमक.
मराठा आरक्षणाच्या मसुद्यावर सरकार सकारात्मक; ‘त्रुटी असतील तर सांगा, दुरुस्त करू,- विखे पाटील
जालना जिल्ह्यातील केदारखेडा येथे मध्यरात्री मराठा बांधवांनी जालना-जळगाव महामार्गावर टायर पेटवून निषेध नोंदवला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधवांनी उद्या (3 सप्टेंबर) जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याने जिल्हा बंदचा निर्णय घेतल्याचं आंदोलकांनी सांगितलं.
दुसरीकडे, बीडमध्येही मराठा बांधव रस्त्यावर उतरले. बीड-जालना महामार्गावर टायर पेटवून ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी काही काळ रस्तारोको केल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांशी चर्चा केली आणि टायर रस्त्यावरून हटवण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंतरवाली सराटी येथे पाठवण्यात आलं होतं. मात्र, संबंधित शिष्टमंडळ अद्याप भेटीसाठी का आलं नाही, असा सवाल करत मराठा बांधवांनी संताप व्यक्त केला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निषेध नोंदवला.
‘भाजपचा पहिला फेकू कोण?’; संदीप देशपांडेंचा भाजपवर थेट निशाणा
जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे सरकारने गांभीर्याने पाहावं आणि त्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.