मोहन भागवतांच्या ब्रिटन दौऱ्याला विरोध; “लोकशाहीत विरोधाचा अधिकार, आम्ही संवादासाठी तयार”, संघाचं स्पष्टीकरण!
Mohan Bhagwat’s UK Tour ब्रिटन दौऱ्याला विरोध होत असल्याने संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाची भुमिका स्पष्ट केली.
Mohan Bhagwat’s UK Tour Faces Opposition; RSS Clarifies Stand : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका, कॅनडा दौऱ्यानंतर ते आता ब्रिटन दौऱ्यावर (Mohan Bhagwat’s UK Tour) आहेत. पण त्यांच्या या दौऱ्याला विरोध होत असल्याने संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर (Sunil Ambekar) यांनी संघाची भुमिका स्पष्ट केली.
ब्रिटनमधील नागरी हक्क संघटनांनी मोहन भागवतांच्या कार्यक्रमांना विरोध केला होता. त्यामुळे सुनील आंबेकर यांनी या विषयावर आपले मत मांडले.
दहीहंडीच्या उत्साहाला डीजेचा अडथळा; पुण्यात पहिल्याच मंडळावर पोलिसांची कारवाई
“ज्यांना विरोध करायचा आहे, त्यांना विरोध करु द्या. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही येथे शांतता, एकता पसरवण्यासाठी आलो आहोत. याकरीता आम्ही सर्वांशी चर्चा करायलाही तयार आहोत. पण ज्यांना चर्चा करायची आहे, त्यांच्याशीच आम्ही चर्चा करायला आलो आहोत.” असे ते म्हणाले.
ब्रिटनमध्ये मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला विरोध का?
मोहन भागवतांच्या या कार्यक्रमामुळे येथील भारतीय समुदायांमध्ये सामाजिक दरी निर्माण होण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षतेला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा ब्रिटनच्या नागरी हक्क संघटनांनी केला. या संघटनांमध्ये ‘हिंदूझ फॉर ह्युमन राईट्स’, ‘यूके-इंडीयन मुस्लिम कौन्सिल’ आणि ‘साऊथ आशिया सॉलिडॅरिटी ग्रुप’ यांसारख्या संघटनांचा समावेश आहे.
थिएटर गाजवल्यानंतर आर. माधवनचा GDN ओटीटीवर, नेटफ्लिक्स होणार प्रदर्शित !