OBC आंदोलकांना आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली; तरीही हाकेंचा मुंबईला जाण्याचा इशारा
OBC Protest Azad Maidan Permission Denied ओबीसी आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली तरी1 सप्टेंबरला लक्ष्मण हाके मुंबईकडे जाणार
परवानगी नाकारण्याच्या या निर्णयामुळे ओबीसी आंदोलनाच्या पुढील भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. आझाद मैदान हे मुंबईतील विविध सामाजिक आणि राजकीय आंदोलनांचे प्रमुख केंद्र असल्याने या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
22 ऑगस्टला अर्ज, 28 ऑगस्टला नकार
वकील मंगेश ससाणे यांनी ओबीसी आंदोलनासाठी आझाद मैदानात परवानगी मिळावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडे 22 ऑगस्ट रोजी अर्ज सादर केला होता. त्यानंतर तब्बल काही दिवसांनंतर, 28ऑगस्टच्या रात्री उशिरा परवानगी नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मोठी बातमी ! मराठा आंदोलकांकडून थेट मंत्र्यांच्या गाडीचा पाठलाग; सोलापुरात गोंधळ
पोलिसांनी नियमावली आणि लागू असलेल्या अटींचा आधार घेत हा निर्णय घेतल्याचे ससाणे यांचे म्हणणे आहे. मात्र, ओबीसी आंदोलकांना परवानगी नाकारल्यानंतर आता आझाद मैदानात नेमक्या कोणत्या आंदोलनांना आणि कोणत्या निकषांवर परवानगी दिली जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लक्ष्मण हाके 1 सप्टेंबरला मुंबईकडे जाणार
दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी आंदोलन घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे परवानगी नाकारली असली तरी हाके यांच्या मुंबईकडे जाण्याच्या भूमिकेमुळे ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
एवरेस्टच्या हिंगाच्या विक्रीवर ‘FSSAI’कडून तातडीने बंदी; तपासणीत ठरवून दिलेल्या निकषांवर अपयश
ओबीसी आंदोलनासाठी आझाद मैदान उपलब्ध होणार का, पोलिस प्रशासन पुढील काळात कोणती भूमिका घेणार आणि आंदोलनासाठी पर्यायी ठिकाण निश्चित केले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.