गोपाळ्या DP चे काय घेऊन बसला? ओमराजेंनी थेट 400 KV च्या EHV केंद्राची मागणी केली…
Omraje Nimbalkar केंद्र सरकारच्या सहकार्याने आवश्यक निधी उपलब्ध करून देत संबंधित EHV उपकेंद्रांच्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी.
Omraje Nimbalkar Seeks EHV Substations : धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये शेती, उद्योग, शहरीकरण आणि ग्रामीण भागाचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे या भागातील विजेची मागणीही सातत्याने वाढत आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहावा आणि भविष्यातील गरजा पूर्ण करता याव्यात, यासाठी विद्युत पारेषण व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी नवीन अतिउच्च दाबाचे विद्युत उपकेंद्रांना (EHV) मंजुरी देण्याची मागणी केली आहे.
खाणमाफियांना फडणवीस सरकार मोठा दणका देणार; IAS रूबल अग्रवाल राज्यभर लक्ष ठेवणार
यासंदर्भात ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय विद्युतमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील विविध ठिकाणी नवीन EHV उपकेंद्रे उभारण्याबाबत सविस्तर निवेदन केंद्रीय मंत्र्यांकडे सादर केले. मध्यंतरी “धाराशिवचा गोपाळ्या” या नावाने एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यात डीपी मिळत नव्हता म्हणून ओमराजेंना पक्ष बदलाय लावला, असे गोपाळ्या म्हणतात. आता ओमराजेंनी पक्ष बदलला आणि जिल्ह्यासाठी डीपी काय थेट 400 के.व्ही. EHV उपकेंद्रांची मागणी केली, त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आहे.
‘या’ ठिकाणी 200 केव्ही उपकेंद्रांची मागणी
निवेदनात कासार शिरशी (ता. निलंगा), शिराढोण (ता. कळंब), येरमाळा/येडशी, लोहारा, वडगाव सिद्धेश्वर/कौडगाव, मुरूम (ता. उमरगा) आणि बार्शी येथे 200 केव्ही क्षमतेची EHV उपकेंद्रे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोठी बातमी! रायगडमध्ये मंत्री गोगावले तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहन
तसेच तुळजापूर आणि परंडा येथे 400 केव्ही क्षमतेची EHV उपकेंद्रे मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या उपकेंद्रांमुळे संबंधित भागातील विद्युत पारेषण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे.
शेतकरी, उद्योग आणि नागरिकांना फायदा
नवीन उपकेंद्रे उभारल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील वीजपुरवठा अधिक स्थिर आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा आहे. वारंवार होणारे वीजपुरवठ्यातील अडथळे कमी करण्यासोबतच वाढत्या वीज मागणीचा भारही अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता येणार आहे.
कुंभमेळ्याचा 591 कोटींचा बनावट वर्क ऑर्डर घोटाळा; गिरीश महाजनांचा नातेवाईकच आरोपी
याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार असून शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होईल. याशिवाय घरगुती ग्राहक, व्यापारी, लघु आणि मध्यम उद्योग तसेच मोठ्या औद्योगिक प्रकल्पांनाही याचा फायदा होणार आहे. आगामी काळात या भागात होणाऱ्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासासाठीही मजबूत विद्युत पारेषण व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.
प्रस्तावांची तातडीने तपासणी करण्याची मागणी
दरम्यान, या सर्व प्रस्तावांची तातडीने तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात यावी, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने आवश्यक निधी उपलब्ध करून देत संबंधित EHV उपकेंद्रांच्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
गांजाच्या नशेत एअर इंडियाचा पायलट! फुकेट-दिल्ली विमानप्रकरणात धक्कादायक खुलासे
धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या वाढत्या विजेच्या गरजा लक्षात घेता या उपकेंद्रांना मंजुरी मिळाल्यास भविष्यातील वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यास मोठी मदत होईल, अशी भूमिका ओमराजे निंबाळकर यांनी मांडली आहे.