मोठी बातमी! लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अन् खासदार प्रियंका गांधींना दिल्ली पोलिसांकडून अटक

Rahul Gandhi : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाला मोठं वळण लागलं असून, ठिय्या देणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

News Photo   2026 10 06T204519.847

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाला (ECI) आता मोठं वळण लागलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. गेल्या ८ तासांपासून राहुल गांधी आंदोलनस्थळी ठिय्या मांडून आहेत. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं असून, आंदोलनात सहभागी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचीही धरपकड सुरु केली आहे.

राहुल गांधी यांच्या आंदोलनादरम्यान पोलिस मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आलं आणि अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. यासोबतच राहुल गांधी यांच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, विरोधकांच्या आंदोलनाला आता आणखी आक्रमक वळण मिळालं आहे.

एमपीएससी आंदोलनावरुन पुण्यात राजकीय रणकंदन, महापौरांचं रोहित पवारांना थेट आव्हान

राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इंडिया आघाडीचे सर्व खासदार हे आकाशवाणी भवन परिसरातील एका झाडाजवळ बसून ठिय्या करत होते. तेव्हा त्यांच्याबरोबर दीपेंद्र हुड्डा, शाम बर्वे, वर्षा गायकवाड, अशा सर्व खासदारांना पोलिसांनी आधी समजावलं. पण त्यानंतर पोलिसांनी अचानक या सगळ्या नेत्यांना उचललं. त्यांना नेण्यासाठी तीन बस आणल्या होत्या. यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी बसमध्ये चढण्यास तीव्र विरोध केला. तरीही त्यांना बळजबरीने पोलिसांनी बसमध्ये ढकललं. त्यानंतर या तिनही बस आकाशवाणी भवन परिसरातून पुढे निघून गेल्या. इथेच पुढे मुख्य निवडणूक आयोगाचे कार्यालय आहे.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी आम्हाला भेटावं, आमच्याशी बोलावं, अशी भूमिका राहुल गांधींनी आणि त्यांच्यासोबतच्या खासदारांनी जाहीर केली आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांची मुख्य मागणी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या राजीनाम्याची आहे. पण सध्या भेटण्याची भूमिका तरी घ्यावी अशी भूमिका मांडण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व खासदारांना आता दिल्ली पोलिसांकडून किंग्जवे पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जेव्हा आंदोलन सुरु केलं होतं तेव्हा पोलिसांनी यापूर्वीही राहुल गांधींना याच पोलिस ठाण्यात नेलं होतं.

follow us