विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरुन राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; “हे अभारतीयपणाचे लक्षण, गृहमंत्र्यांसह मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा”
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आल्याची टीका करत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
Rahul Gandhi’s First Reaction to Student Lathicharge: “This Is Un-Indian”: संसद परिसरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जवरुन काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आल्याची टीका करत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच केंद्रीय गृहमंत्री, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याचा लोकशाही अधिकार आहे. मात्र त्यांच्या मागण्या समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. अशा प्रकारची कारवाई भारतीय लोकशाहीच्या मूल्यांना साजेशी नसून, हे पूर्णपणे “अभारतीयपणाचे” लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले.
फेसलेस आंदोलनामध्ये समाजकंटक, पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर… दिल्लीतील आंदोलनावर फडणवीसांना संशय
“लाठीचार्जचे आदेश देणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी”
राहुल गांधी यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याची वेळ येऊच नये. आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संवादाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्याचबरोबर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.
दिल्लीतील लाठीमारावरून सरकारवर गंभीर आरोप; आंदोलनकर्त्यांवरील कारवाईवर अभिजीत दिपके आक्रमक
“पंतप्रधानांनी अद्याप माफी मागितलेली नाही”
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईनंतरही पंतप्रधानांनी अद्याप दिलगिरी व्यक्त केलेली नाही किंवा माफी मागितलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलन करणारे विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवत होते. या विषयांवर आपण यापूर्वीही अनेकदा संसदेत आणि विविध मंचांवर भूमिका मांडल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपींना सोडणार नाही, कठोर शिक्षा होणार; PM मोदी पहिल्यांदाच बोलले
“विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी दडपशाही”
राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मागण्या देशासमोर नवीन नाहीत. शिक्षण व्यवस्था, भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांमधील अडचणींबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र सरकार या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
CJP Protests : CJP च्या आंदोलनामागे पाकिस्तान? सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरु
“स्पर्धा परीक्षा हा तरुणांसाठी एकमेव आशेचा मार्ग”
आपल्या देशातील विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी, त्यांचं भविष्य उज्वल करण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे स्पर्धा परिक्षा, तो मार्गसुद्धा सरकारने ओबडधोबड करुन ठेवलेला आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा
जखमी विद्यार्थ्यांची घेतली भेट
दरम्यान, लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लोहिया रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही केली. विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत देशभरातून विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.