कुणालने आयफोनसाठी जीवन संपवलं?; “मी पप्पांना सोडून देते” म्हणत आईची विनवणी, तरीही कुणाल थांबला नाही
Sambhaji Nagar Boy Jumps from Mountain आयफोन हे कारण असल्याच्या चर्चेला पोलिसांचा नकार, तरीही आईची विनवणी ऐकून थांबला नाही कुणाल
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps from Mountain : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर 21 ऑगस्ट रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. कुणाल मुरलीधर चांदवडे (Kunal Chandwade) याने डोंगरावरून उडी घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे यांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला. कुणालने आयफोनसाठी स्वतःचे जीवन संपवले, अशी चर्चा सुरु आहे.
बाजारमूल्यात 30 हजार कोटींची घट, लक्ष्य मूल्यही कमी; बीएसईच्या शेअरबाबत तज्ज्ञांची सावध भूमिका
कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर कुणाल सकाळच्या सुमारास खवड्या डोंगरावर गेला. तो टोकाचं पाऊल उचलण्याच्या मनःस्थितीत असल्याचं कुटुंबीयांना समजल्यानंतर त्याचे आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले.
तब्बल तीन तास कुणालची समजूत काढण्याचे प्रयत्न
कुणालला खाली आणण्यासाठी कुटुंबीयांसह पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही प्रयत्न केले. त्याला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी डोंगराच्या खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, कुणाल वारंवार आपली जागा बदलत असल्याने बचाव पथकासमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं.
कुणालने अखेर डोंगरावरून उडी घेतली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली पडले. मुलगा आणि पती दोघेही खाली कोसळल्याचं पाहून आई संगीता यांनीही डोंगरावरून खाली उडी घेतली. या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.
‘आयफोनमुळे जीवन संपवण्याचा प्रयत्न?’ चर्चेला सुरुवात
या घटनेनंतर कुणाल आयफोन 15 (iPhone) घेण्यासाठी किंवा आयफोनच्या कारणावरून जीव संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. मात्र, प्रत्यक्षदर्शी आणि गावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी या चर्चेबाबत वेगळी माहिती दिली.
शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार अॅक्शन मोडमध्ये; सलग बैठकांमुळं राष्ट्रवादीत चर्चांना उधाण
संजय जाधव यांच्या म्हणण्यानुसार, कुणालला आयफोन हवा असल्याची कोणतीही चर्चा घटनास्थळी नव्हती. उलट कुणालकडे आधीपासूनच आयफोन होता. त्याची समजूत काढताना आपण त्याला, “तुझ्याकडे आयफोन आहे, आई-वडील तुझे किती लाड करतात,” असं सांगत होतो, अशी माहिती जाधव यांनी दिली.
पोलिसांकडूनही ‘आयफोन’च्या चर्चेला पूर्णविराम
सोशल मीडियावर आयफोन हेच कुणालच्या टोकाच्या निर्णयामागचं कारण असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्याला दुजोरा मिळालेला नाही.
इथेनॉलमुळं साखर महाग झाली का?, सर्वसामान्यांच्या खर्चावर किती परिणाम?, सरकारने काय दिलं स्पष्टीकरण?
डीसीपी रत्नाकर नवले यांनी आयफोन हे कुणालच्या जीवन संपवण्याचे कारण असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलेलं नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू झालेल्या आयफोनच्या चर्चेपेक्षा घटनेमागील नेमकं कारण काय होतं, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
आईची मुलाला भावनिक साद
या घटनेतील सर्वात हृदयद्रावक भाग म्हणजे कुणाल आणि त्याच्या आईमधील शेवटचा संवाद. कुणालने खाली यावं आणि कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, यासाठी त्याची आई संगीता यांनी अक्षरशः विनवणी केलं.
“तुझा पप्पांसोबत वाद आहे ना? मी आत्ताच मंगळसूत्र काढून फेकते. तुझ्या वडिलांना सोडून देते. तुझ्यासोबत येते. आपण दोघं राहू, पण तू मला सोडून जाऊ नकोस,” अशा शब्दांत आईने मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कुणालची मानसिक अवस्था अत्यंत अस्वस्थ असल्याचं त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. “आई, माझं कोणीच ऐकत नाही. मला जगण्यात रस नाही. माझ्या लाइफचं सोल्युशनच नाही. काहीच होणार नाही गं,” असं कुणालने आईला सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम; आठ दिवसांत 123.87 कोटींची कमाई
या संवादानंतर काही क्षणांतच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि शेवटी कुणालने डोंगरावरून उडी घेतलीच. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू झाल्याने चांदवडे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
दरम्यान, या घटनेमागे नेमकं कारण काय होतं, कुणालची मानसिक अवस्था आणि त्याच्या वडिलांसोबत झालेला वाद यांचा या घटनेशी नेमका संबंध काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे आयफोन हेच कारण असल्याच्या चर्चेवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत तपासाचा निष्कर्ष महत्त्वाचा ठरणार आहे.