शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यात 5,086 कोटींचं वाटप

Farmers Loan Waiver शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात 5,086 कोटी रुपयांचा निधी वितरित; 6 लाख 36 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.

Farmers Loan Waiver

Second Installment of Farmers’ Loan Waiver Distributed : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला गती मिळाली आहे. या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे. या दुसऱ्या हप्त्यात 6 लाख 36 हजार 36 पात्र शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadanvis) यांच्या उपस्थितीत दुसऱ्या हप्त्यातील निधीचे वितरण करण्यात आले.

हायबीमचा त्रास कमी होणार! बाईकपासून ट्रकपर्यंत हेडलाइटच्या नियमांत होणार मोठे बदल?

या योजनेअंतर्गत सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात 5,086 कोटी रुपयांचा निधी वितरित झाल्याने हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांना लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यानंतर 7 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यात 5,029 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. या माध्यमातून 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 6 लाख 36 हजार 36 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे दोन टप्प्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळाला आहे.

32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार

राज्य सरकारकडून ही कर्जमाफी योजना टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे नियोजन आहे.

यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडोला वाद भोवला; ICCने दोघांनाही ठोठावला दंड

याशिवाय 23 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. एकूणच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न

शेतकऱ्यांवरील कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने ही कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात 5,086 कोटी रुपयांचा निधी वितरित झाल्याने सरकारच्या कर्जमाफी प्रक्रियेला वेग आल्याचे दिसत आहे. आगामी काळात उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

साखरेचे भाव गगनाला भिडले, मग पर्याय काय? ऊसाशिवाय ‘या’ पदार्थांपासूनही बनते साखर

follow us