तामिळनाडूत बहुमत जुळवण्याचा खेळ संपला, थलपती विजय उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

टीव्हीकेचा प्रमुख थलपती विजय यांचा आणि राज्यपालांमधील संघर्ष संपला आहे. त्यामुळे आता राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

News Photo   2026 05 09T211733.250

तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. (Vijay) अखरे अभिनेता राजकीय टीव्हीकेचा प्रमुख थलपती विजय यांचा आणि राज्यपालांमधील संघर्ष संपला आहे. त्यामुळे आता राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. थलपती विजय हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

थलपती विजय यांच्या टीव्हीकेला विधानसभा निवडणुकीत 108 जागा मिळाल्या होत्या, त्यांना बहुमतासाठी 10 जागांची गरज होती. मात्र ही जुळवाजुळ करण्यासाठी थलपती विजय याना तारेवरची कसरत करावी लागली. परंतु अखेर त्यामध्ये आता टीव्हीकेला यश आलं आहे. थलपती विजय हे आता तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

थलपती विजय यांनी बहुमत जुळवलं, राज्यपालांची तीनवेळा भेट, व्हीसीकेची मोठी अट

सुरुवातीला जर आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर आम्हाला उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती द्यावी लागतील अशी अट व्हिसीके पक्षाने थलपती विजय यांच्यापुढे ठेवली होती. मात्र आता समोर आलेल्या बातमीनुसार व्हिसीकेनं टीव्हीकेला कोणतीही अट न ठेवता पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त व्हिसीकेच नाही तर आययुएमएलने देखील थलपती विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता थलपती विजय यांच्याकडे 120 आमदार झाले असून, बहुमतापेक्षा या आमदारांची संख्या दोन ने अधिक आहे, त्यामुळे आता थलपती विजय यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान पक्षांचा पाठिंबा मिळताच आता तामिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थलपती विजय यांनी आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर करण्यासाठी आणि सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला आहे. त्यामुळे आता तामिळनाडूनत टीव्हीके सत्तेमध्ये तर डीएमके विरोधी पक्षात असं चित्र आता पहायला मिळण्याची शक्यता आहे. अखेर आता तामिळनाडूमधून सत्ता स्थापनेचा पेच सुटला आहे. रविवारी दुपारी तीन वाजता थलपती विजय हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

follow us