महिलांचे प्रतिनिधित्व कमी असेल तर न्याय कसा मिळणार? हर्षदा देशमुख-जाधवांचा सवाल
Harshada Deshmukh राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व वाढणे गरजेचे असून त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांचा सहभाग असायल हवा, असे हर्षदा यांनी सांगितले
Harshada Deshmukh-Jadhav On Women Reservation : राजकारण, समाजकारण, उद्योग आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्याची गरज आहे. महिलांचे प्रतिनिधित्व कमी असेल, तर त्यांच्या प्रश्नांना योग्य न्याय कसा मिळणार? महिलांच्या अडचणी आणि प्रश्न महिला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यामुळे निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, असे मत पुणे पदवीधर मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव (Harshada Deshmukh) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना व्यक्त केले.
PDCC Bank Election : भरणे, थोपटे, वळसे पाटलांसह सात आजी-माजी आमदारांचे वर्चस्व पणाला
निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख-जाधव सध्या राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्या असून, पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना महिलांचे प्रश्न, शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरही त्यांनी भूमिका मांडली.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक
महिलांच्या स्वावलंबनाबाबत बोलताना देशमुख-जाधव म्हणाल्या की, केवळ शिक्षण मिळणे पुरेसे नाही, तर महिलांना आर्थिकदृष्ट्याही सक्षम करणे आवश्यक आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच महिलांना स्वतःचे निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता येतील. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षणासोबत आर्थिक स्वावलंबनावरही भर देण्याची गरज आहे.
राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा ; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरातांची मागणी
महिलांना राजकारणात आरक्षणाची गरज
राजकारणातील महिलांच्या सहभागावर भाष्य करताना त्यांनी महिलांना राजकारणात आरक्षणाची गरज असल्याचे सांगितले. मात्र, आरक्षण ही संधी असून, ती मिळाल्यानंतर महिलांनी त्या संधीचा प्रभावीपणे उपयोग केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. महिलांकडे नेतृत्व म्हणून पाहण्याची मानसिकता समाजात आणखी मजबूत होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
ड्रीम सोशल फाऊंडेशनची सुरुवात
हर्षदा यांनी ‘ड्रीम सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कामाला सुरुवात केली. इंजिनिअरिंगच्या शिक्षणादरम्यान ग्रामीण भागात काम करताना विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची कमतरता जाणवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दहीवडी येथे करिअर डेव्हलपमेंट कार्यशाळा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी पुढील प्रयत्न सुरू झाले आणि या कामाला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी ड्रीम सोशल फाऊंडेशनची सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.
Video : पुणे पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या?, हर्षदा देशमुख-जाधव यांनी सांगितलं नेमकं कारणं
शिक्षण क्षेत्राबाबतही त्यांनी भूमिका मांडली. शिक्षणाचा प्रसार झाला असला, तरी आता शिक्षणाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. नव्या डिजिटल युगात शाळांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही बनवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात स्किल सेंटर उभारण्याची गरज
पदवीधरांच्या प्रश्नांवर बोलताना रोजगार हा त्यांच्यासमोरील प्रमुख मुद्दा असल्याचे हर्षदा यांनी सांगितले. पदवीधरांना त्यांच्या जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रोजगार आणि कौशल्यविषयक माहितीचा डेटा उपलब्ध असावा. त्या आधारे स्थानिक रोजगाराच्या गरजा आणि स्किल गॅप ओळखून स्किल सेंटर उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
Mirzapur The Movie च्या खास स्क्रीनिंगला अमृता फडणवीस आणि सुप्रिया सुळेंची उपस्थिती
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी पदवीधर संबंधित मतदारसंघाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. मतदार हा 2022 च्या आधीचा पदवीधर असावा लागतो. कागदपत्रांमध्ये मतदारसंघातील राहिवासी दाखला तसेच पदवीधर असल्याचा पुरावा (ग्रॅज्युएशन सर्टीफिकेट, फायनल इयरची मार्कशीट) असवा लागतो. महा गव्हर्नमेंट या वेबसाईटवर याची नोंदणी करता येते. तसेच फॉर्म 18 द्वारे ऑफलाईनही नोंदणी करता येते.