10 वी पास उमेदवारांनी सरकारी नोकरी, ‘या’ विभागात 772 जागांची भरती
जर तुम्ही 10 वी पास असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. दहावी पास आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कारण, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (Directorate of Vocational Education and Training) या उमेदवारांसाठी ७०० हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या संस्थेच्या अनिकृत संकेतस्थळावर या पदरभरती संदर्भातले नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या नोटीफिकेशमध्ये भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याचा पत्ता, अर्ज कसा करावा, वयोमर्यादा याचा सविस्तर तपशील दिला आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांकून अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्जदार हे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने काढलेल्या पदभरतीसाठी अर्ज करायाला सुरवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च होती. मात्र, आता उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सवलत दिली आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक16 मार्च अशी आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहिर केलेली ही भरती एकून 772 पदांसाठी आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आपला डिल्पोमा पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करतांना उमेदवारांनी आपला दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे कागदपत्रे अर्जसोबत जोडणे गरजेचं आहे.
भरतीतील एकून पदे, पदांची नावे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटचा तारीख, अर्ज करण्याची पद्धत, फी, आदी माहिती खाली दिलेली आहे. तरीही उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली जाहीरात नीट काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा. कारण, एकदा अर्ज केल्यावर अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज केल्यास अर्ज रद्द होईल, याची नोंद उमेवारांनी घ्यावी.
पदाचे नाव –
1. निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम
2 कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार
3. अधीक्षक
4. मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स)
5. वसतीगृह अधीक्षक
6. भांडारपाल
7. सहाय्यय भांडारपाल
8. वरीष्ट लिपिक
शैक्षणिक अहर्ता –
पद क्र. 1- निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा ITI उत्तीर्ण आणि 2 वर्षाचा अनुभव
पद क्र. 2- निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम
कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण आणि 3 वर्षाचा अनुभव
पद क्र. 3- अधीक्षक
कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण आणि 3 वर्षाचा अनुभव
पद क्र. 4- मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स)
10 वी उत्तीर्ण तसेच ITI (MMTM/इलेट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिलकल/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) 5 वर्षाचा अनुभव
पद क्र. 5- वसतीगृह अधीक्षक
10 वी उत्तीर्ण, शारीरीक शिक्षणात प्रमामपत्र आणि 1 वर्षाचा अनुभव
पद क्र. 6- भांडारपाल
10 वी उत्तीर्ण, अभियांत्रिका व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण आणि 3 ते 4 वर्षाचा अनुभव
पद क्र. 7- सहाय्यय भांडारपाल
10 वी उत्तीर्ण, अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि 3 ते 4 वर्षाचा अनुभव
पद क्र. 8- वरीष्ट लिपिक
कला/वाणिज्य/विज्ञान/विधी कोणत्याही शाखेतील पदवी आणि 03 वर्षाचा अनुभव
‘शाखा उध्दवस्त करणार असाल तर….’; राजन विचारेंनी दिला इशारा
वयोमर्यादा –
किमान वयोमर्यादा 18 ते कमाल 55 वर्षांपर्यंत आहे. मात्र प्रत्येक पदानुसार ही मर्यादा वेगवेगळी आहे. यात मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सुट आहे.
पद क्र. 1,2,3,4,6,7 साठी वयाची अट 18 ते 40 आहे.
पद क्र. 5 साठी वयोमर्यादा ही 23 ते 40 वर्ष आहे.
पद क्र. 8 साठी वयोमर्यादा ही 19 ते 40 वर्ष आहे.
परीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग – 1000 रुपये, मागासवर्गीय – 900 रुपये,
माजी सैनिकांकडून कोणतीही फी आकारली जात नाही.
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 मार्च 2023
● या पदभरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ : http://www.dvet.gov.in