‘शाखा उध्दवस्त करणार असाल तर….’; राजन विचारेंनी दिला इशारा

Untitled Design   2023 03 12T163543.635

ठाणे : निवडणूक आयोगाना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. शिंदे गटाकडून अधिकृतरित्या शिवसेनेचं नाव वापरलं जातं आहे. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते हे ठिकठिकाणच्या शाखा ताब्यात घेते आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी ठाण्यातील शिवाई नगर या परिसरात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले होते. यावरून मोठा राडा झाला होता. दरम्यान, आता या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (MP Rajan Vichara) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

विचार यांनी सांगितलं की, ज्या शिवसैनिकांनी ज्या शाखेमध्ये जीवाचं रान करून तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवलं, सोबतच आमदार, खासदार आणि मंत्री बनवलं आणि त्या शिवसैनिकांची शाखा तुम्ही ताब्यात घेत आहेत. शाखा हे म्हणजे आमचं घर आहे. मंदिर आहे. ते जर तुम्ही उध्वस्त करणार असाल तर जनता तुम्हाला नक्कीच उत्तर देईल, अशा शब्दात निशाणा साधला.

ठाण्यात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असतांना विचारेंनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी बोलतांना विचारेंना सांगितलं की, धर्मवीर आनंद दिघे यांनी या ठिकाणी ठाण्याचा सांस्कृतिक वातावरण निर्माण करून सांस्कृतिक वारसा जपला होता. त्यांचाच आदर्श घेत आम्ही देखील ते कार्यक्रम सुरू ठेवलेला असल्याचं सांगितलं.

आनंद आश्रमाचं नाव बदलवण्यात आलं. याच्यावरही विचारेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, आनंद आश्रमातून देखील अनेक लोकांनी काम केलेलं आहे. अनेक लोकांनी तिकडं शिवसैनिक घडवले. त्या ठिकाणी आता तुम्ही त्या आश्रमाला स्वतःचं नाव दिलं. आई जगदंबा तुम्हाला सुबुद्धी देवो.. कर्तुत्व हे सिद्ध करावे लागतं. ते असंच येत नाही. कर्तुत्वासाठी जनतेची साथ असावी लागते. येणाऱ्या निवडणुकीत ते तुम्हाला जनता दाखवून देईल. जर हिंमत असेल तर तुम्ही फक्त निवडणूक घेऊन दाखवा, असा इशाराही त्यांनी दिला.

Devendra Fadanvis : पाणी फाउंडेशनमुळे शेतकऱ्यांनी ‘ती हनुमान उडी मारली’

विचारे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर आनंद दिघे, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सर्व या महाराष्ट्रात एकदाच होऊन गेले. हे सगळे फक्त एकदाच घडले. कोणी कितीही नक्कल केली तरी सुद्धा ते त्यांची जागा घेऊ शकत नाहीत. हे सर्वजण आपले आदर्श आहेत. मात्र, त्यांचे विचार तुम्ही कुठे नेऊन ठेवले आहेत? बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आहे, अशी बोचरी टीका विचारेंनी शिंदे गटावर केली.

 

Tags

follow us