AIASL Recruitment : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडमध्ये बंपर भरती; 10 वी पास, डिप्लोमा धारक करू शकतात अर्ज

AIASL Recruitment  : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडमध्ये बंपर भरती; 10 वी पास, डिप्लोमा धारक करू शकतात अर्ज

AIASL Recruitment 2023: इंडियन एअरलाइन्समध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) मध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited) ने विविध पदे भरण्यासाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत सुमारे 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. Air India Air Services Limited भरती मुलाखतीची तारीख आणि वेळ याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

नगर अर्बन बँकेत 322 कोटींंच्या ठेवी, ठेवीदारांना परत कधी मिळणार? प्रशासकांनी सांगितलं

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबईत असणार आहे. त्यामुळं त्यामुळे मुंबईकरांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

एकूण रिक्त पदे- 323

पदाचे नाव आणि रिक्त जागा –
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक ड्यूटी अधिकारी – ५
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – ३९
हॅंडीमन/हँडीवूमन – २७९

शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक ड्यूटी अधिकारी: यांत्रिक/ऑटोमोबाईल/उत्पादन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी पदवी + हलके वाहन चालविण्याचा परवाना (LMV).

रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर: मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रॉडक्शन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स किंवा ITI/NCVT मधील अभियांत्रिकी डिप्लोमा + ऑटोमोटिव्ह/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डरमध्ये 1 वर्षाचा अनुभव + किंवा 10वी पास + हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स (HMV).

हॅंडीमन /हँडीवुमन: 10वी पास

वय श्रेणी –
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या वयाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमदेवारांना वयात सवलत दिली जाणार आहे. त्याचा उल्लेख नोटीफिकेशनमध्ये केलेला आहे.
खुला प्रवर्ग – 18 ते 28 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट

अर्ज शुल्क –
खुली श्रेणी – 500 रु.
मागासवर्गीय/माजी सिपाही – कोणतेही शुल्क नाही.

मुलाखतीचे ठिकाण – श्री जगन्नाथ सभागृह, वेंगुर दुर्गादेवी मंदिराजवळ, वेंगुर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – 683572

मुलाखत सुरू – 17 ऑक्टोबर 2023 सकाळी 9 वाजता.

मुलाखत शेवट – 19 ऑक्टोबर 2023 दुपारी 12 वाजेपर्यंत.

अधिकृत वेबसाइट – http://www.aiasl.in/

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1D9vb-AYYDKxXva9ULrBIGOf3l8u7QEl1/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube