भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘या’ पदांसाठी भरती; तब्बल 55,000 रुपये मिळणार सॅलरी

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘या’ पदांसाठी भरती; तब्बल 55,000 रुपये मिळणार सॅलरी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (Bharat Electronics Limited, BEL)काही पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यातून उमेदवारांना सरकारी नोकरी (Government Job 2023) करण्याची संधी मिळणार आहे. प्रकल्प अभियंता -I (Project Engineer-I) या पदांसाठी ही भरती असणार आहे.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BEL ची अधिकृत वेबसाइट bel-india.in वर जाऊन अधिकची माहिती जाणून घेऊ शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 110 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 मार्च 2023 असणार आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या

या जागांसाठी भरती : प्रकल्प अभियंता-I

एकूण जागा – 110

शैक्षणिक निकष :
प्रकल्प अभियंता-I पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे.
तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

पगार :
प्रकल्प अभियंता-I – 40,000 – 55,000/- रुपये प्रतिमहिना

Onion Price : भाव नाही म्हणून कांद्याची होळी; रोहित पवार म्हणतात, “सरकार दौऱ्यावर, राज्य वाऱ्यावर”

आवश्यक कागदपत्रं :
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

 

● अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 17 मार्च 2023

●  अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : https://bel-india.in/

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube