Blood Group नुसार डाएट घ्या अन् नेहमी तंदुरूस्त राहा…

Blood Group नुसार डाएट घ्या अन् नेहमी तंदुरूस्त राहा…

Blood Group : तुम्हाला माहितीये का? तुमचा आहार ठरवण्यासाठी रक्तगट (Blood Group) देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. जसं आहार हा आपल्या मानसिक आणि शरिरीक विकासवर परिणाम करतो. तसंच आहार ठरवण्यासाठी रक्तगट देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावतो. यावर तज्ज्ञ काय सांगतात? तसेत विशिष्ट रक्तगटानुसार कसा आहार घ्यायला हवा. याविषयी सविस्तर जाणून घेऊ…

पहिल्यांदाच आमदार अन् राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा आहेत तरी कोण?

अनेक संशोधनांमध्ये देखील हे सिद्ध झालं आहे की, विशिष्ट रक्तगटानुसार विशिष्ट आहार घ्यायला हवा. त्यामुळे रक्तगटानुसार तुम्ही तुमचा आहार घेत असाल तर तुमच अनेक आजारांपासून संरक्षण होणार आहे. वजन देखील नियंत्रणात राहतं. आयुर्मान वाढतं. मात्र यामध्ये आरोग्यदायी आहार आणि व्यायामाची देखील तेवढीच गरज असते.

‘ओ’ रक्तगट :

‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांनी हाय प्रोटीन असणारा आहार घ्यायला हवा. त्यामध्ये मटन, मासे, हिरव्या पालेभाज्या आणि फाळांचा समावेश असला पाहिजे. धान्य, कडधान्य सोयाबीन यापासून बनवलेल्या पोळी कींवा भाकरी आहारात असायला हवी. तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांना वजन कमी करण्यासाठी सी फूड, सी प्लांट ब्रोकली, पालक आणि ऑलिव्ह ऑईल हे मदत करत. तसेच ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांनी गहू, मका आणि डेअरी प्रोडक्ट खाणं टाळलं पाहिजे.

‘ए’ रक्तगट :

‘ए’ रक्तगट असलेल्या लोकांनी फळं, भाज्या, टोफू, सी फूड आणि संबंध धान्य अशा प्रकरचा आहार घ्यायाला हवा. तसेच त्यांनी मटन खाणं टाळावं. तसेच वजन कमी करण्यासाठी त्यांनी फळं, भाज्या, अननस, ऑलिव्ह ऑईल आणि सोया मदत करतं. गहू, मका, घेवडा आणि डेअरी खाणं टाळलं पाहिजे.

‘बी’ रक्तगट :

‘बी’ रक्तगट असलेल्या लोकांनी मांस, फळं, डेअरी, सी फूड, धान्यासह वेगवेगळ्या प्रकरंचं अन्न खाल्ल पाहिजे. तर या लोकांनी वजन कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, अंडी, ज्येष्ठ मधाचा चहा, आवश्य घ्यायला हवा. तसेच या लोकांनी चिकन, मका, शेंगदाणे आणि गहू आहारात घेणे टाळले पाहिजे.

‘एबी’ रक्तगट :

‘एबी’ रक्तगट असलेल्या लोकांनी डेअरी, टोफू, मासे, झान्य फळं आणि भाज्या आवश्या खायला हव्यात. तर वजन कमी करण्यासाठी ‘एबी’ रक्तगट असलेल्या लोकांनी टोफू, सी फूड, हिरव्या पालेभाज्या आणि सी प्लांट देखील आपल्या डाएटमध्ये घेतले पाहिजे. तसेच या लोकांनी चिकन, मका आणि घेवडा खायला हवा. आयुर्वेद देखील या गोष्ट मान्य करतं की, विशिष्ट रक्तगटानुसार विशिष्ट आहार घ्यायला हवा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube