ऐन दिवाळीत महागाईचा मोठा फटका? सीएनजी 6 रुपयांनी महागण्याची शक्यता, वाचा सविस्तर
CNG Price May Hike In Diwali : दिवाळीचा (Diwali) सण आठ दिवसांवर येऊन ठेपलाय. महागाईनं अगोदरच कंबरडं मोडलेलं असताना आता पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सीएनजीच्या (CNG Price) दरामध्ये 4 ते 6 रूपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने अगोदरच बजेट कोलमडलं होतं, त्यानंतर आता प्रवास देखील अजून महागणार असल्याचं दिसतंय. गाड्या चालवणाऱ्यांना सीएनजीच्या दरात वाढ झाल्यास मोठा फटका बसणार आहे.
Stock Market : शेअर बाजारात मोठी तेजी; सेन्सेक्समध्ये ५४५, तर निफ्टीमध्ये १०२ अंकांची उसळी
सरकारने काही दिवसांपूर्वी शहरी विक्रेत्यांना स्वस्त घरगुती नैसर्गिक वायूचा पुरवठा देखील 20 टक्क्यांपर्यंत कमी केलाय. अशा परिस्थितीमध्ये इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली (CNG Price May Hike In Diwali) नाही, तर वाहनांना पुरवल्या जाणाऱ्या सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे चार ते सहा रुपयांची वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला; स्थानिक अन् परराज्यातील ७ कामगारांचा मृत्यू
आता महिनाभरातच विधानसभा निवडणुका होणार आहेत. सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यास तो राजकीय मुद्दा बनण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुकांचं काऊंटडाऊन सुरू आहे. दिल्ली अन् मुंबई देशातील सर्वात मोठी सीएनजी बाजारपेठ आहे. या शहरांमध्ये सीएनजी वाहनांची संख्या देखील जास्त आहे. अशातच इंधन दरात वाढ झाल्यास सरकारला कदाचित मतदारांचा रोष देखील सहन करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत सरकार नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सीएनजीच्या उत्पादन शुल्कात कपात करणे हा पर्यायी मार्ग आहे. सध्या केंद्र सरकार सीएनजी इंधनावर 14 टक्के उत्पादन शुल्क आकारते. हे शुल्क प्रति किलोग्रॅम 14 ते 15 रुपये आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्याने किरकोळ विक्रेते वाढीव खर्चाचा बोजा ग्राहकांवर न टाकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार सीएनजीवरील उत्पादन शुल्क कमी करू शकते, अशी देखील चर्चा आहे. इंधन दरात वाढ झाल्यास वाहनधारकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.