ITR भरला नसेल तर काळजी करू नका! 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरता येईल

ITR भरला नसेल तर काळजी करू नका! 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरता येईल

Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 होती. पण तरीही तुम्ही आयटीआर भरला नसेल, तर तुम्ही ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत भरू शकता. ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांच्यासाठी दंडाशिवाय ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. रिपोर्टनुसार, बहुतेक करदात्यांनी आधीच त्यांचे विवरणपत्र भरले आहे.

ज्यांनी अद्याप प्राप्तिकर भरला नाही त्यांचे पुढे काय?
लेट फी लागणार: उशीरा ITR भरल्यास, तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. 5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना लेट फी 1,000 रुपये आहे, तर इतरांसाठी 5,000 रुपये आहे.

दंडात्मक व्याज: 31 जुलै नंतर ITR दाखल करण्याच्या बाबतीत, तुम्हाला देय असलेल्या कोणत्याही करावर दरमहा 1% दराने दंडात्मक व्याज भरावे लागेल.

10 वर्षांनंतर उनाडकटचे वनडेत पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्धच शेवटचा सामना खेळला होता

रिफंडवर व्याज कमी : जेव्हा शेवटच्या तारखेपूर्वी ITR दाखल केला तर करदात्यांना 1 एप्रिलपासून रिफंडच्या तारखेपर्यंत रिफंडच्या रकमेवर दरमहा 0.5% दराने व्याज मिळते. तथापि, उशीरा रिटर्न फाइलच्या बाबतीत, हे व्याज ITR भरल्याच्या तारखेपासून परताव्याच्या तारखेपर्यंत दिले जाते.

आयकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात 31 जुलैपर्यंत 6.7 कोटीहून अधिक करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. यापैकी, 5.62 कोटी पेक्षा जास्त आयटीआर करदात्यांनी व्हेरीफाय केले आहे. 31 जुलैपर्यंत 3.44 कोटी रिटर्न्सची पडताळणी झाली होती.

समृध्दी मगामार्गावरील अपघातातून सरकारने धडा घेतला नाही; जयंत पाटलांचं सरकारवर टीकास्त्र

आयटीआर फाइल करणाऱ्यांची संख्या वाढली
आयटीआर दाखल करणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. गेल्या वर्षी 31 जुलैपर्यंत 5.83 कोटीहून अधिक रिटर्न भरले होते, तर यावेळी ही संख्या वाढली आहे. या वर्षी भरलेले एकूण परतावे (ऑडिटसह) सुमारे 8.5 कोटी आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube