Google Bard : एक चुकीचे उत्तर आणि गुगलला 82,60,76,00,00,000 रुपयांचा तोटा, काय आहे प्रकरण ?

  • Written By: Published:
Google Bard : एक चुकीचे उत्तर आणि गुगलला 82,60,76,00,00,000 रुपयांचा तोटा, काय आहे प्रकरण ?

एका चुकीच्या उत्तरामुळे गुगलची (Google) मालकी असलेल्या अल्फाबेट कंपनीला मोठा फटका बसला आहे. चॅट जीपीटीशी (ChatGPT) स्पर्धा करण्यासाठी गुगलने बार्ड (Google Bard) लॉन्च केला, परंतु पहिल्याच दिवशी असा गोंधळ झाला की कंपनीचे शंभर अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. एआय चॅटबॉट बार्डच्या जाहिरातीमध्ये चुकीच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याने कंपनीला एकाच वेळी $100 अब्जचा फटका बसला आहे.

बार्ड लॉन्च केल्यानंतर गुगलने आपल्या नवीन चॅटबॉटचा एक प्रमोशनल व्हिडिओ पब्लिश केला होता. परंतु त्यात चुकीची माहिती दिली, त्यामुळे गुगलला मोठा धक्का बसला आणि कंपनीचे मार्केट कॅप तब्बल 100 अब्ज डॉलरने घसरले.

हेही वाचा : ChatGPT vs Bard : AI स्पर्धेत गुगल मायक्रोसॉफ्टची शर्यत, एआय सर्च इंजिनला मारेल का?

काय होता तो प्रश्न ?

खरंतर गुगलने बार्ड सेवा लॉन्चसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये बार्ड कशाप्रकारे काम करेल याची माहिती दिली गेली. माहिती देण्यासाठी जीएफएक्सचा वापर करण्यात आला होता. या जाहिरातीमध्ये एका व्यक्तीने बार्डला प्रश्न विचारला होता.

तो प्रश्न असा होता की, “जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा कोणता नवीन शोध मी माझ्या 9 वर्षांच्या मुलाला सांगू शकतो?” या प्रश्नाला उत्तर देताना बार्डमधून दोन उत्तरे दिली गेली. पण यातले दुसरे उत्तर चुकीचे निघाले. बार्डने उत्तर दिले की या दुर्बिणीने आपल्या सौरमालेबाहेरील कोणत्याही ग्रहाचे पहिले छायाचित्र घेतले. हे उत्तर चुकीचे होते.

अमेरिकन अवकाशसंस्था नासाच्या माहितीनुसार 2004 मध्ये युरोपियन अॅडव्हान्स टेलिस्कोपने एक्सोप्लॅनेट्स सदर्न ऑब्झर्व्हेटरी ऑफ स्पेसच्या सौर मंडळाच्या बाहेरील ग्रहांची छायाचित्रे घेतली. या चुकीच्या उत्तरानंतर या बार्ड एआयवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. कंपनीवर चुकीची माहिती दिल्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला. यानंतर अल्फाबेटच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपनी आपला मुद्दा स्पष्ट करण्यात अपयशी ठरल्याने कंपनीला मोठा फटका सहन करावा लागला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube