Government Schemes : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : शेतकरी (Farmer)मित्रांसाठी अत्यंत महत्वाची योजना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने’ची (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme)माहिती आपण पाहणार आहोत. या योजनेतील विम्याचा लाभ घेण्यासाठी काय कागदपत्रे लागतात, पात्रता काय असावी, अर्ज कुठे करावा, आणि या योजने अंतर्गत किती विमा संरक्षण मिळते? याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
पाचव्या टप्प्यात मतदान संथ, मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; चौकशी तर होणारच!
कोणत्या कारणाने अपघात झाल्यास विमा मिळणार? : अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू ओढवला तर शेतकरी कुटुंबाला या योजनेअंतर्गत आधार दिला जातो.
तीन वेळा मंत्रिपदाला नकार, सरकारी वाहनही नाकारलं; वाराणसीच्या पहिल्या खासदाराचं साधं पॉलिटिक्स
‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा? : या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा. आणि या योजनेची चौकशी करून अर्ज करावा लागतो.
अपघात विमा मिळण्याची प्रक्रिया काय? : अपघात झाल्यास पोलीस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, 6 क, 6 ड, मृत्यृ प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचे वारसा प्रमाणपत्र, वारसा अर्जदार इत्यादी कागदपत्रे ही कृषी विभागात जमा करावी लागतात.
कृषी विभाग नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे या कागदपत्रांची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य ती चौकशी होऊन संबंधित शेतकरी कुटुंबास ही विमा रक्कम अदा केली जाते. आता तुम्ही म्हणाल किती रक्कम मिळते? तर अपघातानुसार ही रक्कम ठरवण्यात आलेली आहे.
विमा हप्ता किती भरायचा? : शेतकऱ्याला विमा हप्ता भरण्याची गरज नाही. कारण सरकार शेतकऱ्याच्यावतीने विमा कंपनीस विमा हप्ता भरत असते. मात्र या विम्याचा लाभ हा 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळतो.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांना काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.