पाचव्या टप्प्यात मतदान संथ, मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; चौकशी तर होणारच!
Lok Sabha Election Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील तेरा (Lok Sabha Election) मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. यामध्ये मुंबई, ठाणे या मतदारसंघांचा समावेश होता. मतदान संथ गतीने होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. नागरिकांनीही तक्रारी दिल्या होत्या. या मु्द्द्यावर विरोधकांकडून लक्ष्य करण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील पाचव्या टप्यात मतादानाची टक्केवारी घटली त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली. मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगा लावाव्या लागल्या होत्या. मतदारांना कडाक्याच्या उन्हाचाही त्रास जाणवला. त्यामुळे या मतदानावर काही परिणाम झाला का याची चौकशी करण्याचे आदेश मु्ख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेसी काळजी घेतली नव्हती का? मतदानाची टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले या बाबींचीही चौकशी करण्याचे आदेश आज मुख्यमंत्र्यांनी दिले.
Loksabha Election : शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? ईव्हीएम मशीनला घातला हार!
मुंबईतील कमी मतदानाच्या मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज संशय व्यक्त केला होता. तसेच शिंदे गटावरही गंभीर आरोप केले होते. महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान होईल अशा भागात यंत्रणांनी कासवगतीने काम केल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केला होता. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एकूणच मतदानात संथपणा का आला, यामागे काय कारणं होती यातील सतत्या समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
ईव्हीएम हॅक करता आले नाहीत कारण आम्ही यावेळी जागरुक होतो. तसंच, पैसे वाटतानाही आम्ही पकडलं. मग काय करायचं असा प्रश्न पडल्याने भाजपकडून काही ठिकाणी मतदान प्रक्रिया संथ करण्यात आली, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला. अनेक मुंबईकरांनी भर उन्हात उभं राहून मतदान केलं. तर काही मुंबईकर या उन्हात रांगेत उभा होते. मात्र, ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले हे लोकसशाहीसाठी दुर्दैवी आहे असे संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबईतील मतदान प्रक्रियेवरून राऊतांचा प्रहार! म्हणाले ‘हा’ भाजपचा शेवटचा डाव