Government Schemes : वाहन चालक प्रशिक्षण (विजाभज, इमाव व विमाप्र) योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?
Government Schemes : विजाभज इमाव आणि विमाप्र बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षणाद्वारे (training)स्वयंरोजगाराची (Self Employed)संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक व सामाजिक स्थिरता मिळवून देण्यासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.
Sharvari Wagh: ‘मी अल्फाच्या शूटिंगसाठी काश्मीरला…’, शर्वरी वाघनं सांगितली मन की बात
योजनेच्या प्रमुख अटी :
– उमेदवार विजाभज /इमाव व विमाप्र प्रवर्गाचा असावा.
– उमेदवार हा वाहन प्रशिक्षणासाठी मोटार परिवहन अधिनियमातील तरतुदीनुसार वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता शारीरिक पात्रता आदी बाबींची पूर्तता करणारा आसावा.
– प्रशिक्षण कालावधीमध्ये जिल्हा कार्यालय ते प्रशिक्षण केंद्रापर्यंत जाणे येण्याचे भाडे, आरोग्य तपासणी, छायाचित्र, चालकाचा कच्चा व पक्का परवाना, वाहक परवाना व बिल्ला, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था आदी संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाते.
विधानसभेला ‘मनसे’ किती जागा अन् कुठं-कुठं उमेदवार देणार; राज ठारेंनी एका वाक्यात विषय संपवला
आवश्यक कागदपत्रे : उमेदवाराचा रहिवासी दाखला(Residence certificate), जातीचा दाखला (Caste certificate) उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार) रेशन कार्ड (Ration Card)प्रत/ लाईट बिल, आधार कार्ड आदी.
लाभाचे स्वरुप :
हलके मोटार वाहन चालक प्रशिक्षण, प्रशिक्षण कालावधी – ४० दिवस, मंजूर दर रु.३५२०/- अवजड मोटार वाहन चालक प्रशिक्षण , प्रशिक्षण कालावधी – ४० दिवस , मंजूर दर रु.४१००/-
प्रशिक्षणाचा प्रकार – वाहक (कंडक्टर) प्रशिक्षण.
प्रशिक्षण कालावधी – ८ दिवस , मंजूर दर रु.१६४५/- प्रशिक्षण कालावधी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहणारे स्थानिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहणारे स्थानिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात राहत नसल्यास मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थी रु.३००/- वाहक प्रशिक्षणार्थीस रु.१५०/- प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाते.
अर्ज करण्याचे ठिकाण : संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय