रिलायन्सला पछाडत HDFC बँक बनली मार्केटची नवी ‘बाहुबली’
HDFC Bank-HDFC Merger: एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या रिव्हर्स विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँक निफ्टीची नवीन बाहुबली बनली आहे. निर्देशांकातील बँकेचे मुल्य मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कंपनीपेक्षा जास्त झाली आहे. एचडीएफसी शेअर्समधील ट्रेडिंग 13 जुलैपासून स्टॉक एक्सचेंजमध्ये बंद होणार आहे.
विलीनीकरणानंतर, HDFC बँकेचे मुल्य 14.43% पर्यंत वाढणार आहे. सध्या, रिलायन्स ऑन निफ्टीचे मुल्य 10.9% आहे, जे 10.8% पर्यंत खाली येईल. सोमवारच्या बंद मुल्यानुसार, रिलायन्सचे मार्केट कॅप रु. 18.5 लाख कोटी आहे तर HDFC रु. 9.26 लाख कोटी मार्केट कॅपसह तिसर्या क्रमांकावर आहे. विलीनीकरणानंतर HDFC बँकेचे मार्केट कॅप वाढेल.
रिलायन्सप्रमाणे HDFC बँकेकडे प्रवर्तक नाही. यामुळेच सर्व सूचीबद्ध समभागांमध्ये सर्वात जास्त फ्री फ्लोट असेल. निर्देशांक मुल्य मोजण्यासाठी NSE फ्री फ्लोट मार्केट कॅप पद्धत वापरते. म्हणजेच ज्या स्टॉकमध्ये फ्री फ्लोट सर्वाधिक असेल, त्यांचे मुल्य जास्त असेल.
मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेसाठी उभारणार स्वतंत्र यंत्रणा; गिरीष महाजनांची घोषणा
निफ्टी बँक निर्देशांकातही एचडीएफसी बँकेचे मुल्य 26.9 टक्क्यांवरून 29.1 टक्क्यांपर्यंत वाढेल. ICICI बँकेचे मुल्य 23.3 टक्क्यांवरून 24.4 टक्क्यांवर येईल. निफ्टी बँकेत HDFC बँक आणि ICICI बँकेचे एकूण मुल्य 52.4% असेल. बँकिंग निर्देशांकात SBI, कोटक महिंद्रा बँक आणि अॅक्सिस बँक यांचे मुल्य कमी होईल. ICICI बँक, Infosys, ITC आणि TCS देखील निफ्टी 50 मध्ये कमी मुल्य असेल. LTI Mindtree निफ्टीमध्ये HDFC ची जागा घेईल.
अब्जाधीशाचे अमर होण्याचे स्वप्न, तरुण होण्यासाठी केली रक्ताची अदलाबदली
HDFC बँकेने दलाल स्ट्रीटमध्ये उत्कृष्ट पदार्पण केले आहे. 14 मार्च 1995 रोजी कंपनीचा IPO उघडला तेव्हा 53.31 पट सबस्क्राइब झाला होता. तेव्हापासून ते गुंतवणूकदारांसाठी पैसे कमवणाऱ्या अव्वल समभागांपैकी एक आहे. समभागाने गेल्या तीन महिन्यांत फ्लॅट रिटर्न परतावा दिला आहे आणि सोमवारी बीएसईवर 1,656.30 रुपयांवर बंद झाला. मॉर्गन स्टॅनलीच्या मते, त्याची टारगेट प्राइज 2,110 रुपये निश्चित करण्यात आली आहे. रिलायन्सचा शेअर सर्वोत्तम उच्चांकाकडे जात आहे. मंगळवारी तो 2,764.50 रुपयांवर गेला. त्याचा आतापर्यंतचा उच्चांक रु 2,856.15 आहे. गेल्या वर्षी 29 एप्रिलला शेअरने उच्चांक गाठला होता.