मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेसाठी उभारणार स्वतंत्र यंत्रणा; गिरीष महाजनांची घोषणा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत होत आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. यानुसार आता आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
‘अजितदादांच्या शपथविधीची माहिती शिंदेनाही नव्हती’; बच्चू कडूंचे धक्कादायक विधान
अ आणि ब गटाच्या परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून घेतल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. अधिक्षक, डॉक्टर अशा मोठ्या पदांच्या यामध्ये समावेश आहे. पण आरोग्य विभागातील क आणि ड गटाच्या परीक्षा या नियमित होतात तशाच होतील, असेही ते म्हणाले.
मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेसाठी उभारणार स्वतंत्र यंत्रणा; गिरीष महाजनांची घोषणा @Dev_Fadnavis @mieknathshinde @girishdmahajan pic.twitter.com/91MtEn8Ttq
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 12, 2023
हनी ट्रॅपमध्ये अडकलं निर्मला सीतारमण यांचं अर्थ मंत्रालय; पाकिस्तानला शेअर झाली गोपनीय माहिती?
प्रत्येक जिल्ह्याध्ये मेडीकल कॉलेज, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे अशी मोदींची संकल्पना आहे. त्यामुळेच आम्ही आता 11 वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परवाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आम्ही 9 महाविद्यालयाला परवानगी दिली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवशक्यता भासणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारणार असे आरोग्यमंत्री म्हटले आहे. या निर्णयामुळे आरोग्या विभागाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.