महाराष्ट्रात HIV बाधितांमध्ये वाढ; 17 ते 22 वयोगटातील तरुणांचाही समावेश…

महाराष्ट्रात HIV बाधितांमध्ये वाढ; 17 ते 22 वयोगटातील तरुणांचाही समावेश…

HIV Maharashtra News : महाराष्ट्रात एचआयव्ही प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. 2022-2023 यावर्षी महाराष्ट्रात सुमारे 14 हजार 347 एचआयव्हीबाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये 5 ते 6 टक्के तरुण 17 ते 22 वयोगटाचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला या वयोगटातील तरुणांमध्ये आजाराविषयी जनजागृती वाढवण्यासाठी प्रभावी धोरण राबवावं लागणार असल्याचं दिसून येत आहे.

Pradip Jaiswal : छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी प्रदीप जैस्वालांनी दंड थोपटले; म्हणाले, ‘आम्हीच..,’

तरुणांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यातील 14 हजार महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एड्स नियंत्रण संस्थेच्या आकडेवाडीनूसार राज्यात सुमारे 2.36 लाख एचआयव्हीबाधित लोकं आढळून आली आहेत. त्यापैकी 4 हजार रुग्ण मुंबईत आढळून आली आहेत.

Rashmika Mandana Look: रश्मिका मंदानाचा Animal मधील फर्स्ट लुकनं इंटरनेटचा पारा चढला …

यंदाच्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट कालावधीतच मुंबई शहरात 1432 HIV बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत दररोज 12 HIV बाधित रुग्ण आढळून येत असल्याची माहिती मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटीकडून देण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2024: अखेर जेडीएसची भाजपबरोबर युती ! लोकसभा निवडणूक एकत्र लढणार

दरम्यान, किशोरवयीन मुलांमध्ये एचआयव्ही प्रकरणांमध्ये हळूहळू वाढ होत आहे, ही वाढ समाजासाठी चांगली नसून एचआयव्ही आणि लैंगिक संक्रमित संक्रमणांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आरसीसी आयोजित करण्याची गरज आहे.

नेटवर भरपूर लैंगिक साहित्य उपलब्ध असून तरुण लोकं नक्कीच शोध घेतात. परंतु वैज्ञानिक लैंगिक शिक्षणाला विरोध केला जातो किंवा त्यापासून दूर राहत, असल्याचं HIV SDT डॉ. ईश्वर गिलाडा म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube